गोेंदे दुमाला फाटा येथे अपघातात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:29 PM2020-04-10T23:29:15+5:302020-04-10T23:30:22+5:30

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे झालेल्या अपघातात एक महिला ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे.

Gomende Dumala woman killed in accident in FATA | गोेंदे दुमाला फाटा येथे अपघातात महिला ठार

नाशिक-मुंबई महामार्गावरील गोंदे दुमाला येथील झालेल्या अपघातात मोटारसायकलची झालेली अवस्था.

Next
ठळक मुद्देघटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे झालेल्या अपघातात एक महिला ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे.
गोंदे दुमाला येथे नाशिकहून मुंबईकडे धान्य घेऊन भरधाव जात असलेल्या आयशरने (क्र. एमएच १८ बीजी ५६८५) रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकल (क्र. एमएच १५, बीपी ७९७३) जोरदार धडक दिली.
या अपघातात मोटार सायकलस्वाराची आई नंदाबाई जनार्दन सुर्वे (५०), रा. बोराळा, वाशिम (हल्ली मुक्काम गोंदे फाटा ) जागीच ठार झाली. तर मुलगा विलास जनार्दन सुर्वे (२५), रा. बोराळा, वाशिम व नात भावना विलास सुर्वे (९) गंभीर जखमी झाली.
दरम्यान सदर अपघाताची माहिती वाडीवºहे पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी घोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

Web Title: Gomende Dumala woman killed in accident in FATA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.