मतदानाचा टक्का वाढविणे हेच उद्दिष्ट : आनंदकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:28 AM2019-07-28T00:28:06+5:302019-07-28T00:28:28+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदारयादी अधिकाधिक पारदर्शक आणि दोषविरहित असावी, यासाठी गेल्या महिनाभरापासून सुरू केलेल्या मोहिमेत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील या कामात जनतेचाही सहभाग वाढला आहे. निवडणुकीच्या या कामाविषयी उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्याशी साधलेला संवाद...

 The goal is to increase voting percentage: Happy | मतदानाचा टक्का वाढविणे हेच उद्दिष्ट : आनंदकर

मतदानाचा टक्का वाढविणे हेच उद्दिष्ट : आनंदकर

Next

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदारयादी अधिकाधिक पारदर्शक आणि दोषविरहित असावी, यासाठी गेल्या महिनाभरापासून सुरू केलेल्या मोहिमेत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील या कामात जनतेचाही सहभाग वाढला आहे. निवडणुकीच्या या कामाविषयी उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्याशी साधलेला संवाद...
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९साठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि मतदारयाद्या दोषविरहित करण्याची प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात सध्या सुरू आहे. गेल्या महिनाभराच्या या मोहिमेत मतदानाविषयी प्रचंड जागरूकता निर्माण झाली असून, लोकसहभागही वाढला आहे. दररोज जिल्ह्यात मतदानाविषयीच्या होणाऱ्या मोहिमेतून मतदारही दक्ष झाला आहे. सदर मोहीम ३० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
प्रश्न : मतदार जनजागृतीसाठी सुरू केलेल्या निवडणूक शाखेच्या मोहिमेविषयी काय सांगाल?
आनंदकर : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मतदानाची टक्केवारी पाहता जिल्हा प्रशासनाने मतदार यादीच्या शुद्धीकरणाची मोहीम लगेचच हाती घेतली. यामध्ये प्रामुख्याने यादीतील मयत आणि दुबार नावे वगळणे, दुरुस्ती करणे, चुका दुरुस्त करणे, यादीसंदर्भात असलेल्या तक्रारींचा निपटारा करणे आणि यादी अधिकाधिक दोषविरहित आणि परिपूर्ण करण्याकडे भर देण्यात आला. १ जानेवारी २०१९ च्या अर्हता दिनांकावर पात्र असलेल्या सर्व मतदारांची मतदार म्हणून मतदार यादीत नोंद करणे आणि विधानसभेत मतदानाची टक्केवारी कशी वाढू शकेल, यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही मोहीम फलद्रूप होताना दिसते.
प्रश्न : मोहिमेत मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद कसा आहे?
आनंदकर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मागील ५२ वर्षांतील सर्वाधिक मतदान टक्केवारीची नोंद झाली, परंतु यावरही जिल्हा निवडणूक प्रशासन समाधानी नाही. मतदानाची टक्केवारी आणखी वाढविण्यासाठी निवडणूक शाखेने अनेक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमात सर्व प्रशासकीय यंत्रणा व जिल्ह्यातील नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.
प्रश्न : मतदारयादी शुद्धीकरणात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकची कामगिरी कशी आहे?
आनंदकर : राज्यातील ३६ जिल्ह्यांचा विचार करता नाशिक जिल्हा हा निश्चितच अग्रेसर आहे. नाशिक जिल्हा हा निवडणूक कामाच्या व्यापकतेच्या दृष्टीने राज्यातील चौथ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे. महानगरीय किंवा नागरी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा क्रमांक वरचा आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मतदारयादी व एकंदर निवडणूक संचलनामध्ये नाशिक जिल्हा वरच्या क्रमांकावर आहे.
प्रश्न : या मोहिमेचे निवडणूक शाखेने कसे नियोजन केले आहे?
आनंदकर : जिल्हा निवडणूक शाखेने जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासह नायब तहसीलदार आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामध्ये या मोहिमेविषयी जागृती करण्यात येऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना कामाचे प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आलेले आहे. निवडणूक कामाची आवड असणारे नागरिक आणि विद्यार्थीही या कामात जोडले जात आहेत.
प्रश्न : या मोहिमेत मतदारयाद्या किती प्रमाणात पारदर्शक होऊ शकतील, असे वाटते?
आनंदकर : नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या आजमितीस जवळपास ६५ लाख एवढी असून, मतदारांची संख्या ४५ लाखांपेक्षा अधिक आहे. लोकसंख्या व मतदारांचा विचार करता नाशिक जिल्हा जगातील १००पेक्षा जास्त देशांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या जिल्ह्यात मतदार याद्यांचे शुद्धीकरण करणे खरोखरीच मोठे आव्हान आहे. तरीसुद्धा जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे मतदारयादी अधिकाधिक परिपूर्ण होत आहे.
प्रश्नावलीचा उपक्रम
जिल्ह्यातील जवळपास २५ ते ३० लाख मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास सात लाख विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांमार्फत एक प्रश्नावली मतदारांपर्यंत पोहोचविली जात आहे. मतदान विषयक जागरूकता निर्माण करणाºया या प्रश्नाने यादी शुद्धीकरणाला अधिक चालना मिळतेय.
निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात निवडणूक कर्मचाºयांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू आहे. या मोहिमेत मतदान कर्मचाºयांना प्रोत्साहन देण्याची संकल्पना या मोहिमेला बळ देणारी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर चांगले मतदान झाले त्या कर्मचाºयांना गौरविण्यात आले. विधानसभेसाठीही कर्मचाºयांना प्रोत्साहित केले जात आहे.

Web Title:  The goal is to increase voting percentage: Happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.