दिंडोरीत गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:49 PM2020-08-14T12:49:19+5:302020-08-14T12:49:37+5:30

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कमर्चारी पुरस्कार सोहळा पार पडला.

Glory to the meritorious headmaster, teachers in Dindori | दिंडोरीत गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षकांचा गौरव

दिंडोरीत गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षकांचा गौरव

Next

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कमर्चारी पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी जनता इंग्लिश स्कुलमध्ये मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अद्यक्ष गुलाब भामरे, के के अहिरे,साहेबराव कुटे,आर डी निकम,सी बी पवार, एन एन खैरनार,सुनिल भामरे,किशोर जाधव , बी जी पाटील , संग्राम करंजकर आदी उपस्थित होते. त्यात जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार माध्यमिक विद्यालय पिंपरखेड येथील उपशिक्षक डी जी वाणी यांना व गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार ए डी काळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक नगरसेवक संग्राम करंजकर यांनी केले . जिल्हा शिवसेनेच्यावतीने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यावेळी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Glory to the meritorious headmaster, teachers in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक