गॅस सबसीडी सोडली, आता आरक्षणही सोडा - प्रितम मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 05:09 PM2020-03-02T17:09:21+5:302020-03-02T17:14:46+5:30

समाजातील आर्थिक दुर्बल व वंचित घटनांना शासकीय योजना व सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक सक्षम व सधन नागरिकांनी ज्या प्रमाणे स्वयंपाकाच्या गॅसची सवलत सोडली, त्याप्रममाणे आरक्षणही सोडून देत उपेक्षित घटकांसाठी जागा रिक्त करून देण्याचे आवाहन खासदार डॉ. प्रतिम मुंडे यांनी केले आहे. 

Gas subsidy released, now leave reservation - Pritam Munde | गॅस सबसीडी सोडली, आता आरक्षणही सोडा - प्रितम मुंडे 

गॅस सबसीडी सोडली, आता आरक्षणही सोडा - प्रितम मुंडे 

Next
ठळक मुद्देआथिक सक्षम नागरिकांनी आरक्षण सोडावेसमाजातील वंचित, उपेक्षितांसाठी जागा द्या समाजाच्या कार्यत्रमात डॉ प्रितम मुंडे यांचे आवाहन

नाशिक :  राज्यातील वेगवेगळ््या विभागांमध्ये  समाजात मोठी विषमता असून, नाशिकपेक्षा मराठवाडा्यात समाज अजूनही मागास असून समाजातील आर्थिक दुर्बल व वंचित घटनांना शासकीय योजना व सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक सक्षम व सधन नागरिकांनी ज्या प्रमाणे स्वयंपाकाच्या गॅसची सवलत सोडली, त्याप्रममाणे आरक्षणही सोडून देत उपेक्षित घटकांसाठी जागा रिक्त करून देण्याचे आवाहन खासदार डॉ. प्रतिम मुंडे यांनी केले आहे. 
नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे  रविवारी (दि.२)वंजारी समाजाच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या, पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांनी देशातील सधन व आर्थिक सक्षम नागरिकांना गॅसवर दिली जाणारी सबसीडी सोडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक नागरिकांनी सबसिडी सोडल्याने उज्वला योजनेअंतर्गत अनेक गरीब व वंचित कुटुंबांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील आर्थिक व सधन नागरिकांनी  शिष्यवृत्तीसह शैक्षणिक आरक्षण सोडून समाजातील वंचित व आर्थिक दुर्बल घटकांसाठी जागा रिक्त करून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्याचप्रमाणे जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करताना त्यांनी एकूण लोकसंख्येच्या तुलनेत समाजाची लोकसंख्या स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे सांगत ओबीसी जनगणनेसाठी लोकसभेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. 

Web Title: Gas subsidy released, now leave reservation - Pritam Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.