दरोडाच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 08:06 PM2021-10-20T20:06:23+5:302021-10-20T20:08:10+5:30

लासलगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार टोळीचा लासलगाव पोलिसांनी पर्दाफाश करीत कारसह १,३ ९, ०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

The gang preparing for the robbery was exposed | दरोडाच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश

दरोडाच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्देलासलगाव : सराईत गुन्हेगारांना लासलगाव पोलिसांनी केले चर्तूभुज

लासलगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार टोळीचा लासलगाव पोलिसांनी पर्दाफाश करीत कारसह १,३ ९, ०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मंगळवारी (दि.१९) कोजागिरी पौर्णिमा व ईद ए मिलाद सणाचे निमित्ताने नाशिक जिल्हयात पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड सोमनाथ तांबे यांनी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीत सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे, स.पो.उ.नि. शिवाजी घोडे, पोलीस नाईक राजेश घुगे, योगेश शिंदे, कैलास महाजन, संदिप शिंदे, पोलीस कॉन्टेबल प्रदिप आजगे, सागर आरोटे, संजय देशमुख असे लासलगाव शहरामध्ये पेट्रोलिंग करत टाकळी विंचुर गांव हद्दीतुन जाणाऱ्या विंचुर - प्रकाश राज्यमार्गावर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या फाट्याजवळ नाकाबंदी सुरु करुन वाहनांची तपासणी करत असतांना चांदवडकडुन लासलगावकडे येणारी एक कार नाकाबंदी पासुन काही अंतरावर थांबुन त्यांचे ताब्यातील वाहन वळवून पुन्हा चांदवड बाजुकडे पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागल्याने त्या वाहनावर संशय आल्याने नाकाबंदी ठिकाणचे अधिकारी / अंमलदार यांनी वाहनाकडे पळत जात वाहन थांबविले.
त्यावेळी त्यामध्ये असलेल्या इसमांनी पळण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांनी ६ जणांना ब्यात घेतले. त्यांची विचारपुस करत असतांना उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात येताच व नांव, गांव सांगण्यास टाळाटाळ करु लागले.
त्यामुळे त्याची व वाहनाची झडती घेतली.
त्याठिकाणी कार (एम एच १२ एम बी ४०७१) या वाहनातील लोकांची चौकशी केली असता साबीर शब्बीर कुरेशी (२८) रा. वार्ड नं. २, मटन मार्केट समोर, श्रीरामपुर, जि. अहमदनगर, सर्फराज बाबा शेख (१९) रा. वार्ड नं. २, पाण्याचे टाकीजवळ, श्रीरामपुर, कुर्बान इस्माईल शेख, (२३) रा . वार्ड नं. २, सुन्नाभाई यांच्या वखारीजवळ, श्रीरामपुर, सनीराज विलास ढोंकणे, (१९) रा. सरस्वती कॉलनी, कालव्याजवळ, श्रीरामपुर, सागर ऊर्फ संदिप सुरेश कांबळे, (२६) रा. रामनगर, वार्ड नं. १, इदगाह मैदानालगत,
श्रीरामपुर, (वाहन चालक), योगराज मोहन सोनवणे, (२४) रा. वार्ड नं. २, मटन मार्केट जवळ, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर अशी नावे सांगितली. तर वाहनाची झडती घेता वाहनामध्ये दरोडा टाकण्याचे साहित्य आढळली.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रदिप आजगे यांच्या फिर्यादीवरुन लासलगाव पोलिस स्टेशनला या सर्वांच्या विरुध्द भा.द.वि. कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या इसमांची तांत्रिक माहिती प्राप्त केली असता त्यांच्या विरुध्द गंभीर स्वरुपाचे या अगोदर श्रीरामपुर जिल्हा अहमदनगर येथे गुन्हे दाखल असल्यााची माहिती मिळाली. आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उप निरीक्षक देविदास लाड हे करीत आहे. (२० लासलगाव ३)

 

Web Title: The gang preparing for the robbery was exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.