लासलगाव ग्रामपंचायतीच्यावतीने प्रत्येक विभागात गणेश विसर्जन सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 05:48 PM2020-08-31T17:48:18+5:302020-08-31T17:49:06+5:30

लासलगाव : कोवीड-१९ च्या पार्श्वभुमीवर मंगळवारी (दि.१) होणाऱ्या श्रीगणपती विसर्जनसाठी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाकडुन प्रत्येक प्रभागात अशा सहा ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे,अशी माहीती लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली.

Ganesh Immersion Facility in each division on behalf of Lasalgaon Gram Panchayat | लासलगाव ग्रामपंचायतीच्यावतीने प्रत्येक विभागात गणेश विसर्जन सुविधा

लासलगाव ग्रामपंचायतीच्यावतीने प्रत्येक विभागात गणेश विसर्जन सुविधा

Next
ठळक मुद्देघरात पॉझीटीव्ह रु ग्ण असतील त्यांनी श्रीगणेशाचे विसर्जन घरीच करावे.

लासलगाव : कोवीड-१९ च्या पार्श्वभुमीवर मंगळवारी (दि.१) होणाऱ्या श्रीगणपती विसर्जनसाठी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाकडुन प्रत्येक प्रभागात अशा सहा ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे,अशी माहीती लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली.
नागरीकांनी आपले श्रीगणेशाचे विसर्जन/मुर्ती दान करण्यासाठी ग्रामपालिकेने सांगितलेल्या ठिकाणीच सोशल डिस्टसिंगचा वापर करु न करावे. श्रीगणेशाचे विसर्जन करतांना मास्कचा वापर करावा. तसेच श्रीगणेशाचे विसर्जनाचे वेळी नमुद ठिकाणी गर्दी करु नये. ज्यांचे मुर्ती विसर्जन / दान केल्यानंतर तात्काळ घरी जावे. श्री.गणेशाची शेवटची आरती/पुजा घरु नच करु न यावी. ज्यांच्या घरात पॉझीटीव्ह रु ग्ण असतील त्यांनी श्रीगणेशाचे विसर्जन घरीच करावे.
वार्ड क्र . १ शिवकमल मंगल कार्यालय, वार्ड क्र . २ बोराडे हॉस्पटील जवळील ओपन स्पेस, वार्ड क्र . ३ सरस्वती विद्यामंदिर प्रांगण, वार्ड क्र . ४ ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगण, वार्ड क्र . ५ शिवाजी चौक, वार्ड क्र . ६ किल्याच्या पाठीमागे गणरायाचे विर्सजन करावे असे आवाहन केले आहे.

Web Title: Ganesh Immersion Facility in each division on behalf of Lasalgaon Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.