Gajanan Gavit, the mastermind of the serial killer in Nashik | नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार गजानन गावितची निर्घृण हत्या
नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार गजानन गावितची निर्घृण हत्या

नाशिक : पुणे महामार्गावरील बजरंग वाडी येथील एका हॉटेलजवळ युवकाचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली.  गजानन गावित असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. गजानन हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. 
नाशिक शहरांमध्ये गेल्या महिनाभरापासून खून सत्र सुरू आहे. शहरात असुरक्षित वातावरण तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  या खुनाच्या घटनेने महिनाभरात खुनाचा आकडा अर्धा डझन झाला आहे. राजरोस घडणाऱ्या खुनाच्या घटनांनी नाशिक हादरले आहे. 8 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान शहरात प्रत्येकी एक याप्रमाणे सहा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एक व्यवसायिक, तरुणी, चार युवकांचा समावेश आहे. 
खुनासारखे गंभीर गुन्हे घडत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. तसेच परिसरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच भर दुपारी सिडको येथे एका युवकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा तपास गती धरत नाही. तोच मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास एका सराईत गुन्हेगारांची हत्या करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरात खुनाच्या घटना थांब नसून पोलीस यंत्रणाही चक्रावून गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Web Title: Gajanan Gavit, the mastermind of the serial killer in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.