सिन्नर सायकलिस्टच्या अध्यक्षपदी गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:41 PM2020-02-12T22:41:37+5:302020-02-12T23:51:29+5:30

सिन्नर सायकलिस्टच्या अध्यक्षपदी समाधान गायकवाड यांची, तर कार्याध्यक्षपदी अनिल कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी निवडण्यासाठी सायकलिस्टच्या सदस्यांची बैठक नुकतीच हॉटेल जी नाइनमध्ये पार पडली.

Gaikwad presides over Sinnar cyclist | सिन्नर सायकलिस्टच्या अध्यक्षपदी गायकवाड

सिन्नर सायकलिस्टच्या अध्यक्षपदी समाधान गायकवाड यांची, तर कार्याध्यक्षपदी अनिल कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याप्रसंगी डॉ. संदीप मोरे, रामभाऊ लोणारे, नंदकुमार पाटील, मुकेश चव्हाणके, ज्ञानेश्वर घेगडमल, ज्ञानेश्वर इलग, बाळासाहेब केदार, नंदकुमार निºहाळी, अशोक तिकोणे, कैलास निरगुडे, संजय गुजर आदी.

googlenewsNext

सिन्नर : सिन्नर सायकलिस्टच्या अध्यक्षपदी समाधान गायकवाड यांची, तर कार्याध्यक्षपदी अनिल कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकारी निवडण्यासाठी सायकलिस्टच्या सदस्यांची बैठक नुकतीच हॉटेल जी नाइनमध्ये पार पडली. त्यात मावळते अध्यक्ष डॉ. संदीप मोरे यांनी गायकवाड यांच्या नावाची सूचना केली. त्यास नगरसेवक रामभाऊ लोणारे यांनी अनुमोदन देत गायकवाड यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले. कार्याध्यक्षपदी अनिल कवडे, तर उपाध्यक्षपदी मुकेश चव्हाणके यांची निवड करण्यात आली. डॉ. मोरे यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली. यावेळी संदीप ठोक, शिवाजी नागरे, ज्ञानेश्वर घेगडमल, ज्ञानेश्वर इलग, बाळासाहेब केदार, नंदकुमार निºहाळी, अशोक तिकोणे, कैलास निरगुडे, प्रा.संजय गुजर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. नंदकुमार पाटील यांच्या हस्ते सर्वांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Gaikwad presides over Sinnar cyclist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.