अंत्यकर्म, श्राद्धविधी करता येतील स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:47 PM2020-03-28T23:47:23+5:302020-03-28T23:50:25+5:30

नाशिक : सध्या कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडणे थांबले आहे. अशावेळी ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अंत्यकर्म तसेच श्राद्ध विधी करणे मुश्कील बनले आहे. परंतु सध्याचे संकट निवळल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध विधी करता येतील व ते धर्मशास्राने संमत केले असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

Funerals, rituals may be postponed | अंत्यकर्म, श्राद्धविधी करता येतील स्थगित

रामकुंड

googlenewsNext
ठळक मुद्देपंचांगकर्त्यांचा दावा । कोरोना संकटामुळे अनेकांना धार्मिक विधी करण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सध्या कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउन लागू झाल्याने घराबाहेर पडणे थांबले आहे. अशावेळी ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अंत्यकर्म तसेच श्राद्ध विधी करणे मुश्कील बनले आहे. परंतु सध्याचे संकट निवळल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध विधी करता येतील व ते धर्मशास्राने संमत केले असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाउनही घोषित केले आहे. या संकटकाळात सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद ठेवली आहेत. शिवाय धार्मिक विधीही थांबविण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली, त्रिपिंडीसारखे विधी स्थगित करण्यात आले आहेत तर नाशिकला रामकुंडावर दशक्रि या विधीसह अन्य विधीसाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे अत्यावश्यक असेल तरच विधी होत आहेत. पण त्यावेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. संचारबंदीमुळे सर्व खासगी वाहने, बसेस यांना रस्त्यावर आणण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अशा वेळी कुणाच्या कुटुंबात व्यक्तीचे निधन झाले असल्यास त्याच्या अंत्यविधीनंतर अंत्यकर्म आणि श्राद्धविधी करण्यात अडचणी येत आहेत. अस्थिविसर्जनासाठीही रामकुंडावर पोहचणे अनेकांना अवघड होऊन बसले आहे. अशा आपतकालीन परिस्थितीत अंत्यकर्म आणि श्राद्ध विधी सवडीनुसार नंतरही करता येतील, असे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे.सप्तशती पाठकोरोनाची महामारी रोखण्यासाठी सर्वत्र पूजा-पाठ, प्रार्थना केल्या जात आहेत. नाशिक येथील रामकुंडाजवळील गंगा-गोदावरी मंदिरात पुरोहित संघातर्फे सप्तशती पाठ सुरू आहेत. अतुलशास्री गायधनी हे पाठ वाचन करत आहेत.सध्याचे संकट असलेले वातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म अंतरीत म्हणून करता येते. हे धर्मशास्रास संमत आहे. मंत्राग्नी झालेला नसेल तरी सर्व अस्थि विसर्जन कराव्यात आणि पुढे अंत्यकर्म करताना आधी पालाश विधि करून, मग नवव्यापर्यंतचे विधी करावेत आणि त्याच दिवशी दहाव्याचे कर्म करावे. घरातील दिवा ११व्या दिवशी विसर्जित करावा, तसेच सुतक ११व्या दिवशी संपते; त्यामुळे इतर सर्व व्यवहार, घरातील पूजा सुतक संपल्यानंतर करता येईल. तसेच प्रथम वर्षश्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्धसुद्धा जर त्या तिथीला करणे जमले नाही तर वातावरण निवळल्यावर अष्टमी किंवा व्यतिपात किंवा अमावास्या यापैकी कोणत्याही एका दिवशी अंतरीत प्रथमवर्ष श्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्ध करावे, असे अंतरीत श्राद्ध करणे धर्मशास्र संमत आहे
- मोहन दाते,
दाते पंचांगकर्ते, सोलापूर

Web Title: Funerals, rituals may be postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.