राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 08:53 PM2021-02-01T20:53:26+5:302021-02-02T00:50:33+5:30

देवळा : अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन होण्याच्या उद्देशाने रविवारी (ता.३१) रोजी देवळा शहरातून श्रीराम रथाची शोभायात्रा काढण्यात आली. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, भाऊसाहेब पगार, तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, अशोक आहेर, अतुल पवार, जितेंद्र आहेर, पुंडलिक आहेर यांच्यासह वारकरी मंडळातील पदाधिकारी व सदस्य तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नागरिक उपस्थित होते.

Fundraising for construction of Ram temple | राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन

अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठीच्या निधी संकलन अभियानांतर्गत देवळा येथील पाच कंदील चौकात श्रीराम रथाच्या शोभायात्रेत सहभागी केदा आहेर यांच्यासह वारकरी मंडळाचे सदस्य व इतर रामभक्त नागरिक.

Next
ठळक मुद्देदेवळा येथे श्रीराम रथाची शोभायात्रा काढण्यात आली.

देवळा : अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन होण्याच्या उद्देशाने रविवारी (ता.३१) रोजी देवळा शहरातून श्रीराम रथाची शोभायात्रा काढण्यात आली. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, भाऊसाहेब पगार, तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, अशोक आहेर, अतुल पवार, जितेंद्र आहेर, पुंडलिक आहेर यांच्यासह वारकरी मंडळातील पदाधिकारी व सदस्य तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नागरिक उपस्थित होते.

अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्माणास प्रारंभ झाला असून यानिमित्ताने संपूर्ण भारतात 'निधी संकलन अभियान' चालू आहे. या पार्श्वभूमीवर देवळा येथे श्रीराम रथाची शोभायात्रा काढण्यात आली. रामगीते, बैलजोडी जुंपलेला रथ, त्यात श्रीरामाची प्रतिमा आणि जय श्रीरामचा जयघोष यामुळे भक्तिमय वातावरण होते.
कळवण रोड, बसस्थानक, निमगल्ली, सराफ बाजार, पाच कंदील या शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढत व पूजन करत उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी आवाहन पत्रके, स्टिकर यांचे वाटप करत निधी संकलनाबाबत जनजागृती करण्यात आली.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे स्वयंसेवक व संघाचे जिल्हा प्रचारप्रमुख बापू शिंदे, ग्रामविकास प्रमुख पुंडलिक आहेर, तालुका कार्यवाह अशोक मोरे, शामराव सूर्यवंशी, प्रमोद शेवाळकर, काशीनाथ सोनवणे, लक्ष्मीकांत पाटील, मोठाभाऊ पगार, गणेशानंद महाराज, पी. के.आहेर, गोपाल शिंदे, निनाद मगर, दुर्गेश सोनवणे, बाप्पा महाजन, विष्णू शेवाळे, विलास महाले, राजू सोनजे, अनिल सावंत, कुशल हिरे, हर्षद मोरे, किशोर आहेर, तेजस सूर्यवंशी आदींचा सहभाग होता.

Web Title: Fundraising for construction of Ram temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.