प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांनाच कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:55 AM2019-09-24T01:55:49+5:302019-09-24T01:56:10+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुण्याच्या यशदा संस्थेत तीन दिवस विधानसभा निवडणुकीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या, परंतु त्यानंतर अन्य विभागांत बदली झालेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या सेवा पुन्हा वर्ग करण्यात आल्या असून, अशा अधिकाºयांना तत्काळ विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमणुका देण्यात आल्या आहेत.

 Functions only for trained officers | प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांनाच कामे

प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांनाच कामे

Next

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुण्याच्या यशदा संस्थेत तीन दिवस विधानसभा निवडणुकीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या, परंतु त्यानंतर अन्य विभागांत बदली झालेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या सेवा पुन्हा वर्ग करण्यात आल्या असून, अशा अधिकाºयांना तत्काळ विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमणुका देण्यात आल्या आहेत. नाशिक महापालिकेचे उपायुक्त राहुल पाटील यांची नेमणूक
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा विधानसभा मतदारसंघासाठी करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुका आटोपल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यातून मतदार नोंदणी, मतदार जनजागृती, संभाव्य मतदान केंद्रांची पाहणी आदी कामे प्रशासकीय पातळीवर करण्यात आली होती. निवडणूक तयारीचा भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक अधिकाºयांसाठी पुण्याच्या यशदा येथे तीनदिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये अधिकाºयांना विधानसभा निवडणुकीचे कार्यक्षेत्र, बदललेले कायदे, मतदानप्रक्रिया, मतदान यंत्राची हाताळणी, मतमोजणीचे तंत्र आदी बाबींवर अधिकाºयांना मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे आता अशा अधिकाºयांना पुन्हा प्रशिक्षण देणे शक्य नसल्यामुळे निवडणूक आयोगाने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महसूल अधिकाºयांचा शोध घेत त्यांच्या सेवा तात्पुरत्या वर्ग करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार नाशिक महापालिकेचे उपायुक्त राहुल पाटील, विभागीय महसूल आयुक्तालयातील स्वाती थविल, तळोद्याचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, नंदुरबारचे उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर या अधिकाºयांच्या निवडणूक विषयक कामासाठी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणुका केल्या आहेत.

Web Title:  Functions only for trained officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.