‘विनाअनुदानित’ शिक्षकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:53 AM2019-08-27T00:53:40+5:302019-08-27T00:54:28+5:30

महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला होता.

 Front of 'unaided' teachers | ‘विनाअनुदानित’ शिक्षकांचा मोर्चा

‘विनाअनुदानित’ शिक्षकांचा मोर्चा

Next

नाशिकरोड : महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला होता.
अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे व अघोषित शाळा, तुकड्या व ज्युनियर कॉलेज यांना अनुदान पात्र घोषित करून २० टक्के अनुदान द्यावे आदी मागण्यासाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने गेल्या दि. ६ आॅगस्टपासून आंदोलन सुरू आहे. सोमवारी (दि. २६) दुपारी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने बिटको कॉलेजपासून विभागीय आयुक्त कार्यालय व शिक्षण उपसंचालक कार्यालयावर घोषणा देत अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला होता. विभागीय उपायुक्त प्रतिभा संगमनेरे, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात समितीचे राज्य सचिव गोरख कुळधर, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब ढोबळे, कांतीलाल नेरे, जिल्हाध्यक्ष भरत भामरे, उदय तोरावने, राजाराम गायकवाड, मनोज वाकचौरे, निशा पाटील, मनीषा पवार, सविता देसले, सोनल पाटील आदी सहभागी होते.

Web Title:  Front of 'unaided' teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.