नाशिकमध्ये आघाडीचे भवितव्य टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:19 AM2019-04-25T05:19:21+5:302019-04-25T05:20:02+5:30

कोकाटे यांची बंडखोरी सेनेला डोईजड; राष्ट्रवादीची मदार मित्रपक्षांवर

In front of Nashik, the frontline of the front of the frontline | नाशिकमध्ये आघाडीचे भवितव्य टांगणीला

नाशिकमध्ये आघाडीचे भवितव्य टांगणीला

googlenewsNext

- श्याम बागुल

नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा युतीविरुद्ध आघाडी अशीच लढत होत आहे. मात्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची अपक्ष उमेदवारी व बहुजन वंचित आघाडीने ऐनवेळी उमेदवार दिल्यामुळे वरकरणी चौरंगी होत असलेल्या या लढतीत कोणाची उमेदवारी कोणत्या उमेदवाराला फायदेशीर व तोट्याची ठरते यावरच युती, आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तर आघाडीकडून माजी खासदार व छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. एक अपवादवगळता नाशिक मतदारसंघाने सलग दुसऱ्यांदा तोच खासदार निवडून दिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक अटीतटीची आहे. त्याचप्रमाणे तुरुंगातून सुटल्यानंतर भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून, गेल्या निवडणुकीत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न भुजबळ यांच्याकडून होत आहे.

निवडणुकीच्या अगोदर बहुजन वंचित आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, अशी घोषणा केली होती. परंतु समीर उमेदवार झाल्यामुळे त्यांनी पवन पवार यांना उमेदवारी देऊन आघाडीसमोर आव्हान उभे केले आहे, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे ते अपक्ष लढत आहेत. त्यांची उमेदवारी शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखीची ठरली असून, त्याचा फायदा आघाडीला होण्याची शक्यता अधिक आहे.

अर्थातच, वंचित आघाडीचा फटका राष्टÑवादीला बसण्याची भीती आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या जाहीर सभा होऊन वातावरणनिर्मिती झाली आहे. दुसºया टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या सभा आहेत. त्याचप्रमाणे नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचीही अंतिम टप्प्यात सभा होणार असल्याने कुंपणावरच्या मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला होता. महापालिकेपासून विधानसभेपर्यंत मनसेचे वर्चस्व होते. त्यामुळे राज यांच्या युतीविरोधी प्रचाराला मतदार कसा प्रतिसाद देणार यावर मतांची गणिते अवलंबून आहेत.

गेल्या पाच वर्षात उडान योजनेंतर्गत नाशिक हवाई सेवेशी जोडले, शंभर एकर क्षेत्रात टेस्टिंग लॅबचे भूमिपूजन झाले. शंभर एकरमध्ये कृषी टर्मिनल मार्केट मंजूर करून घेतले. विकासाच्या अनेक योजना मतदारसंघात आणल्या. - हेमंत गोडसे,
खासदार, शिवसेना

पाच वर्षांपूर्वी मंजूर झालेली विकासकामे पूर्णत्वास जाऊ शकली नाही. अनेक प्रकल्प आजही रखडले आहेत.विकासाच्या नुसत्याच बाता मारल्या. कृतीतून काहीच नाही. एक तरी दृश्य प्रकल्प खासदारांनी दाखवावा.
- समीर भुजबळ,
राष्टÑवादी कॉँग्रेस

कळीचे मुद्दे
महापालिकेची करवाढ, आघाडी सरकारच्या काळातील मंजूर होऊनही रखडलेल्या प्रकल्पांवर भर.
सेनेअंतर्गत गटबाजीला उधाण, रिपाइं आठवले गट नाराज; काँग्रेसचे नेते प्रचारात, कार्यकर्ते मात्र आरामात.

Web Title: In front of Nashik, the frontline of the front of the frontline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.