सोशल साईट्‌सवरून फसवणूक; लासलगाव पोलिसांकडून जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 08:20 PM2020-12-17T20:20:21+5:302020-12-18T00:28:37+5:30

लासलगाव : सोशल साईटस‌्वरून आर्थिक फसवणुकीबरोबरच फेक अकाउंटच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचे प्रकार वाढू लागल्याने लासलगाव पोलिसांनी यबाबत जनजागृती अभियान सुरू केले असल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे.

Fraud on social sites; Awareness from Lasalgaon Police | सोशल साईट्‌सवरून फसवणूक; लासलगाव पोलिसांकडून जागृती

सोशल साईट्‌सवरून फसवणूक; लासलगाव पोलिसांकडून जागृती

Next
ठळक मुद्देवाढते प्रकार : सावधानता बाळगण्याचे आवाहन

सोशल माध्यमाद्वारे फसवणुकीचे वाढते प्रकार आता ग्रामीण भागातही होऊ लागले आहेत. ओझर येथील एचएएलमध्ये अशाच प्रकारे हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशाची संरक्षणविषयक माहिती पाकिस्तानातील गुप्तहेर संघटनेने मिळविल्याचे प्रकरण ताजे आहे. याशिवाय, एजन्सीच्या माध्यमातून व्यवसायाची संधी आहे, असे सांगून नवागतांना फसवण्याची नवी पद्धत समोर आली आहे. विंचूर येथे एका कंपनीच्या एजन्सीचे आमिष दाखवून ऑनलाइन पद्धतीने रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले. सदर कंपनीच बनावट असल्याचे लक्षात आल्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. जुन्या वस्तू खरेदीबरोबरच आता थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाउंटचा वापर करून बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या मित्र परिवाराकडून उसनी रक्कम ट्रान्सफर करण्याचा प्रकारही विंचूर येथे घडला आहे. कांदा व धान्य व्यापारामुळे लासलगाव, पिंपळगाव बसवंत व विंचूर भागात कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यामुळे या भागात फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यासाठीच लासलगाव पोलिसांनी त्याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.
एटीएमसंदर्भात मोबाइलवर विचारणा करून फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण भरपूर आहे. तसेच हनी ट्रॅपमध्ये अडकवत लुटण्याचे प्रकार ग्रामीण भागात घडू लागले आहेत. त्यामुळे महिला व युवतींनी देखील कोणत्याही फायद्याच्या आमिषाला बळी पडू नये. कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी.
- राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक, लासलगाव

Web Title: Fraud on social sites; Awareness from Lasalgaon Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.