बीएसएनएल वाचविण्यासाठी ‘फोर-जी’ योजना विचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:47 PM2019-10-14T22:47:09+5:302019-10-15T00:56:59+5:30

आर्थिक संकटात सापडलेल्या बीसएनएलकडून (भारत संचार निगम लिमिटेड) आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कर्मचारी कपातीसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि फोर-जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे.

'Four-G' scheme under consideration to save BSNL | बीएसएनएल वाचविण्यासाठी ‘फोर-जी’ योजना विचाराधीन

बीएसएनएल वाचविण्यासाठी ‘फोर-जी’ योजना विचाराधीन

Next
ठळक मुद्देपुनरुज्जीवनाचे प्रयत्न : दुर्गमभागातील स्वस्त सेवेची ग्वाही

नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या बीसएनएलकडून (भारत संचार निगम लिमिटेड) आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कर्मचारी कपातीसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि फोर-जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून संकट स्थितीवरही मात करून बीएसएसएल दुर्गम भागातील परवडणाऱ्या सेवेसह देशातील आपत्कालीन स्थितीतही सेवा सुरूच ठेणार असल्याची ग्वाही बीएसएनएलचे महाव्यवस्थापक संजय कुमार सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.
बीएसएनएलला आर्थिक सहकार्यासाठी कें द्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने लाल दिवा दाखवून सेवा बंद करण्याचा सल्ला दिल्याने बीएसएनएल बंद होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक संजयकुमार सिन्हा यांनी प्रसिद्धपत्रकाच्या माध्यमातून बीएसएनएल बंद होणार नसल्याचा खुलासा केला आहे. बीएसएनल पुनरुज्जीवनासाठी सक्रिय असून बीएसएनएलच्या पुनरुज्जीवणासाठी कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्यासोबतच आणि फोर- जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संजयकुमार सिन्हा यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले
आहे.
त्यासोबच बीएसएनएलकडे उपलब्ध असलेल्या मालमत्तांचे मॉनिटरेशन करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असून, यामाध्यमातू आर्थिक पाठबळ उभे करून नैसर्गिक आपत्तीच्या कठीण काळात आणि अगदी दुर्गम ठिकाणीही परवडणारी सेवा बीएसएनएलकडून सुरूच ठेवली जाणार असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.
नाशकात ६५० कर्मचाºयांना व्हीआरएस शक्य
नाशिक जिल्ह्यात सुमारे बीएसएनएलचे ९५० कर्मचारी व अधिकारी आहे. मात्र सध्यस्थिती तीनशे ते साडेतीनशे कर्मचाºयांवरही जिल्ह्यातील विविध केंद्रांचे कामकाज सुरळीत चालू शकते, अशी माहिती नाशिक महाव्यवस्थापक नितीन महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाºयांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रांवरील सुरक्षारक्षक आणि अन्य खर्चांत बीएसएनएलने यापूर्वीच कपात केली असून, यात आता कर्मचारी कपातीची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: 'Four-G' scheme under consideration to save BSNL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.