न्यायडोंगरीत माजी आमदार आहेरांचे पॅनल विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 01:26 AM2021-01-19T01:26:25+5:302021-01-19T01:29:04+5:30

नांदगाव : भावाभावातला संघर्ष राजकीय क्षेत्राला परिचित असल्याने, शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय तणाव असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तापालट होऊन माजी आमदार अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलने बाजार समितीचे माजी सभापती विलास आहेर यांच्या पॅनलचा पराभव करत विजयश्री खेचून आणली.

Former MLA Aher's panel wins in Nayadongri | न्यायडोंगरीत माजी आमदार आहेरांचे पॅनल विजयी

न्यायडोंगरीत माजी आमदार आहेरांचे पॅनल विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देपराभवाचे उट्टे काढले : शिवसेनेचे पॅनल पराभूत

नांदगाव : भावाभावातला संघर्ष राजकीय क्षेत्राला परिचित असल्याने, शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय तणाव असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तापालट होऊन माजी आमदार अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलने बाजार समितीचे माजी सभापती विलास आहेर यांच्या पॅनलचा पराभव करत विजयश्री खेचून आणली. याआधीच्या पंचवार्षिकमध्ये शिवसैनिकांनी अनिल आहेरांची ७० वर्षांची सत्ता संपुष्टात आणून सत्ता विजय नोंदविला होता. त्यामुळे गेल्या वेळच्या पराभवाचे उट्टे काढण्यात आहेर यशस्वी झाले आहेत.

अनिल आहेर यांच्या पॅनलला १२, त्यांचे चुलतभाऊ विलास आहेर यांच्या पॅनलला २ व इतरांना ३ जागा मिळाल्या आहेत. विलास आहेर व शशिकांत मोरे या शिवसेनेच्या नेत्यांमधील ईर्ष्या मतांची विभागणीस कारणीभूत झाली. त्याचा फायदा अनिल आहेर यांना मिळाला. तसेच कोरोना काळातली मदत अनिल आहेरांच्या पथ्यावर पडली. दोन्ही पॅनलने १७ पैकी १४ जागांवर निवडणूक लढवली होती. तीन जागा बहुल वंजारी, आदिवासी वस्ती असलेल्या तांड्यात आपापसात लढल्या गेल्या. या जागा ह्यखर्चिकह्ण असल्याकारणाने त्या ठिकाणी पॅनलने उमेदवार उभे केले नव्हते, असे बोलले जाते. 

साकोऱ्यात दोन्ही गट बहुमतापासून दूर
दुसरे राजकीयदृष्ट्या जागरूक गाव म्हणजे साकोरे या ठिकाणच्या लढती अत्यंत अटीतटीच्या झाल्या. बोरसे आडनाव असलेल्या व्यक्तींचे राजकारणातले वर्चस्व हा साकोरे गावचा सत्तेचा विषय असतो. याही वेळी तसेच झाले. बोरसेंचे दोन गट विरोधात लढले. महाविकास आघाडीशी जवळीक असलेलेले महेंद्र बोरसे आठ व शिवसेनेचे रमेश बोरसे सहा जागा मिळाल्याने दोन्ही पॅनल बहुमतापासून दूर राहिले. अतुल बोरसे यांना तीन जागा मिळाल्या.

जातेगावी राष्ट्रवादीकडून शिवसेनेला सत्ता
जातेगावला १५ जागांपैकी परिवर्तन पॅनलचे विजय पाटील व बंडू पाटील यांना ११ जागा मिळाल्या. शिवसमता पॅनल गुलाब चव्हाण, सुभाष पवार यांना ४ जागांवर समाधान मानावे लागले. येथे सत्त्ता परिवर्तन झाले. राष्ट्रवादीकडून सत्त्ता शिवसेनेकडे गेली.

बोलठाणला शिवसेनेला बहुमत
बोलठाण येथे १३ पैकी शिवसेनाप्रणित रफीक व अनिल रिंढे यांच्या पॅनलला सात, तर काँग्रेसचे सुभाष नहार यांच्या पॅनलला पाच जागा मिळाल्या आहेत. याआधी एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. शिवसेनाप्रणित पॅनलला बहुमत मिळाले असले तरी गेली दोन टर्म्स निवडून आल्यावर एकत्र येण्याचा किस्सा यावेळी घडेल का? असा प्रश्न मतदारांच्या मनात आहे. भालूर ग्रामपंचायत भाजपचे दिगंबर निकम यांच्या पॅनलला आठ जागा, काँग्रेसचे विठ्ठल आहेर यांच्या पॅनलला तीन जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी संमिश्र सत्ता होती.

Web Title: Former MLA Aher's panel wins in Nayadongri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.