वनहक्क मालकीच्या जमीनींचा झाला कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 06:05 PM2020-09-22T18:05:37+5:302020-09-22T18:06:09+5:30

वैतरणानगर :इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी येथील आदिवासी बांधवांच्या पारंपारिक वनहक्क मंजूर क्षेत्रात सपाटीकरण कामे पूर्ण झाली आली आहेत. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतील प्रयत्नांनी कृषी विभागाच्या माध्यमातून ही कामे करण्यात आली.

Forest ownership lands were transformed | वनहक्क मालकीच्या जमीनींचा झाला कायापालट

डोंगराळ जमिनीचे सपाटीकरण झाल्याने जमिनीचा झालेला कायापालट पिकांतून दिसतो आहे.

Next
ठळक मुद्देआदिवासी बांधव झाले समृद्ध:रब्बी हंगामातील पिकेही घेणे शक्य होणार

वैतरणानगर :इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी येथील आदिवासी बांधवांच्या पारंपारिक वनहक्क मंजूर क्षेत्रात सपाटीकरण कामे पूर्ण झाली आली आहेत. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतील प्रयत्नांनी कृषी विभागाच्या माध्यमातून ही कामे करण्यात आली. या कामांमुळे डोंगराकडे असणाऱ्या चढउताराच्या क्षेत्रात आता वेगवेगळी पिके घेणे सहज सोपे झाले आहे. बहुतांश ठिकाणी पारंपरिक नागली, वरई हीच पिके घेतली जायची. आता भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके घेतली जातात. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकेही घेणे शक्य होणार आहे.
वनहक्क मंजूर असूनही बºयाचदा वन विभागाकडून आदिवासी बांधवांची वनहक्क मंजूर करण्यात आलेल्या जमिनीत मशागत व जमीन सुधारणा करतांना अडवणूक व्हायची. त्या क्षेत्रांत ट्रॅक्टर ,जेसीबी अथवा इतर यांत्रिक पद्धतीने सपाटीकरण तसेच जमीन सुधारणा अथवा मशागतीची कामे करता येत नव्हती. आदिवासी बांधव नेहमीच वन विभागाच्या दडपणाखाली असायचे. अनेकदा ट्रॅक्टर, जेसिबी मशीन जप्तीच्या भीतीपोटी त्यांचे मालक वनहक्क जमिनीत मशीन नेत नसत. परिणामी वनहक्क मंजूर असूनही त्या ठिकाणी शेती करणे, पिके घेणे अवघड होते. ही समस्या भंडारदरावाडीतील आदिवासी बांधवांनी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्याकडे मांडली. त्यांनी वनहक्क मंजूर प्रमाणपत्र, सातबारा उतारे व जातीचे प्रमाणपत्र जमा करून कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केला. ही कामे आदिवासी उपयोजनेतून मंजूर करून कृषी विभागामार्फत कामे करून घेतली.जिथे नागली, वरई पिके घ्यायला सुध्दा अडचण यायची तिथे भात ,सोयाबीन,भुईमूग ही पिके घेतली आहेत. आता रब्बी हंगामात हरबरा, मसूर, कडू वाल, गोड वाल, शाळू आदी पिके घेतली जातील.
सपाटीकरण व सुधारणा करण्यासाठी लागणारा खर्च व वन विभागाकडून होणारी अडवणूक ह्या दोन्ही बाबींचा निपटारा झाल्यामुळे आदिवासी बांधव समाधानी झाले आहेत. यासह आदिवासी बांधवांचे जागृत देवस्थान जागमाता भागात परिसर सुधारणा, देवीच्या परिसरात ओटा मजबुतीकरण करून काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.सामूहिक वनहक्क मंजूर करण्यात आले आहे. म्हणून पळस टेम्भुर्णी, बेल पाने, बांबू यांपासून आदिवासी बांधवांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे.

 

Web Title: Forest ownership lands were transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.