पेठमध्ये दीड लाखाच्या निधीसह अन्नसाठा संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:42 PM2020-03-31T17:42:49+5:302020-03-31T17:43:22+5:30

कोरोनाच्या साथरोगाच्या प्रादुभावाने अनेक कुटुंबांना दोन वेळच्या पोटाची चिंता निर्माण झाली असून हजारो प्रवाशी पायपीट करीत आपले गाव गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर प्रशासनाने अडवलेल्या स्थलांतरीत मजूरांच्या मदतीसाठी तालुकावासिय पुढे सरसावले असून दीड लाख रूपयांसह २३ क्विंटल धान्यसाठा संकलित झाला आहे.

 Food storage in Peth with one and a half lakh funds | पेठमध्ये दीड लाखाच्या निधीसह अन्नसाठा संकलित

पेठमध्ये दीड लाखाच्या निधीसह अन्नसाठा संकलित

googlenewsNext
ठळक मुद्देएक हात मदतीचा - नागरिक सरसावले

पेठ : कोरोनाच्या साथरोगाच्या प्रादुभावाने अनेक कुटुंबांना दोन वेळच्या पोटाची चिंता निर्माण झाली असून हजारो प्रवाशी पायपीट करीत आपले गाव गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर प्रशासनाने अडवलेल्या स्थलांतरीत मजूरांच्या मदतीसाठी तालुकावासिय पुढे सरसावले असून दीड लाख रूपयांसह २३ क्विंटल धान्यसाठा संकलित झाला आहे.
तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांनी तालुक्यातील सामाजिक संस्था, व्यापारी महासंघ, लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलावली होती. लॉकडाऊन झाल्याने महाराष्ट्र - गुजरात सीमेवर असल्याने पेठ मार्गावरून वाहनातून , पायी जाणारे प्रवाशी अडकले आहेत. या प्रवाशांच्या निवारा व पोट पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आदिवासी आश्रमशाळांमधील मोकळी असलेली वसतीगृहे उपयोगात आणावी असे उपविभागीय अधिकारी डॉ. संदिप आहेर, ,तहसिलदार संदिप भोसले व पेठ नगराध्यक्ष मनोज घोंगे यांच्या संयुक्त संकल्पनेतून ठरविण्यात आले. तसेच सोशल मिडीयाचे माध्यमातून व्यापारी, संघटना यांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयात घेतली . संकटात सापडलेल्या बांधवांना मदतीसाठी साथ देण्याची संकल्पना मांडताच तब्बल १ लाख ४० हजारांचा निधी तसेच २३ क्विंटल तांदुळ संकलित करण्यात आला.
 

Web Title:  Food storage in Peth with one and a half lakh funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.