भुकेल्यांना अन्न.... हेच आमचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 08:59 PM2020-03-31T20:59:17+5:302020-03-31T21:00:10+5:30

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणच्या मजुरांना तसेच इतर ठिकाणाहून येणाऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वच सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

Food for the hungry .... That's our goal | भुकेल्यांना अन्न.... हेच आमचे ध्येय

भुकेल्यांना अन्न.... हेच आमचे ध्येय

Next
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सामाजिक संघटनांचा पुढाकार; जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणच्या मजुरांना तसेच इतर ठिकाणाहून येणाऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वच सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. काही ठिकाणी एक महिना पुरेल इतका किराणा तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. येवला/घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे गरीब कुटुंबांसाठी २५ युवकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दोन्ही वेळा घरपोच अन्नछत्र चालविण्याचा मानस या युवकांनी केला आहे. हे अन्नछत्र लॉकडाउन संपेपर्यंत अखंडपणे दोन्ही वेळा भोजन पुरविणार आहेत.
घरपोच अन्नछत्र ही संकल्पना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचा भाग असून, गर्दी न होऊ देता भुकेल्या कुटुंबांपर्यंत आम्ही पोहोचणे हे दैनंदिन ध्येय बनले असल्याचे अन्नछत्र समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. घोटी शहराच्या परिसरात गोरगरीब मजूर, कामगार १०० च्या वर कुटुंबे राहत असून, ४०० च्यावर नागरिकांसाठी दैनंदिन घरपोच अन्नछत्र सुरू केले आहे. लॉकडाउन जोपर्यंत आहे तोपर्यंत सकाळ व संध्याकाळी घरपोच अन्नछत्र सेवा पुरविल्या जाणार असल्याचा युवकांचा मानस आहे. गरीब कुटुंबांचा शोध तसेच सेवा पुरविण्याचा संकल्प घेत अखंडपणे सुरू राहणार असल्याचे गोपी हांडे, श्रीकांत काळे, चेतन वालझाडे, योगेश पवार, गणेश शिंदे, विशाल पिचा, सुरेश मुनोत, नाना सूर्यवंशी व घोटी शहर अन्नछत्र सेवा समितीच्या वतीने कार्य करीत आहे. घोटी परिसरात गरीब, गरजू कुटुंब असल्यास त्वरित आयोजकापर्यंत कळविण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले
आहे.
कापसे फाउण्डेशनकडून गरजूंना मदत
येवला : लॉकडाउन व संचारबंदीने बाजारपेठा, सर्वच व्यवसाय, रोजगार ठप्प झाल्याने हातावर पोट असणाºया कष्टकरी, मजूर, गोरगरिबांच्या दोन वेळच्या अन्नाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कष्टकरी, मजुरांची भूक लक्षात घेऊन येथील कापसे फाउण्डेशनने मोफत भोजन उपलब्ध करून दिले आहे. वडगाव बल्हे (ता. येवला) येथील कापसे मळा येथे कष्टकरी, मजूर, गोरगरीब, गरजूंबरोबरच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांनाही हे मोफत भोजन दिले जात आहे.
यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, बाळासाहेब कापसे, नामदेव कापसे, दिलीप खोकले, बाळासाहेब वाल्हेकर, जितेश पगारे, सरपंच मीरा कापसे, सुनीता खोकले, सुभाष सोमासे, रवि जमधडे, भाऊसाहेब कापसे, अरविंद संसारे, प्रशांत संसारे, दत्तात्रय कापसे, किशोर कापसे, सोपान मोरे, साहेबराव कापसे आदींसह नागरिक उपस्थित होते.

सिन्नर : हिंदुस्तान पेट्रोलियम कार्प्ॉोरेशन लि. यांच्या वतीने कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सिन्नरमधील मोलमजुरी करणारे कामगार व गरजूंना किराणा साहित्याचे एक महिना पुरेल इतके वाटप माजी आमदार राजाभाऊ वाजे व तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, युवामित्रचे सुनील पोटे, मुख्याधिकारी केदार, डॉ. महावीर खिवंसरा, मनीष गुजराथी, महेश वाजे, संजय शेळके, दत्ता बोºहाडे, बजूनाथ शिरसाठ, रामनाथ पावसे, शुभम घुगे आदी उपस्थित होते.

दिंडोरीत गरजूंना धान्य वाटप

दिंडोरी : इंदिरानगर येथील गरजूंना राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलतर्फेकिराणा साहित्य वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू असलेल्या हातावर पोट असणाºया नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाटपप्रसंगी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष तौसिफ मणियार, डॉ. योगेश गोसावी, श्यामराव हिरे, छबू मटाले, हबीब सय्यद, मोसिन शेख, रशीद पिंजारी, शकील शेख, मंजूर शेख, मोसिन शेख, परवेज शेख, मोईन मनियार, अरबाज अत्तार, विलास लाखे, मनोज दांडेकर आदी उपस्थित होते.

टाकेद येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत

नांदूरवैद्य : गोरगरीब आदिवासी भटक्यांची उपासमार होऊ नये म्हणून सर्वतीर्थ टाकेद येथील आदिवासी कातकरी वस्तीत नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनतर्फे कोबी, फ्लॉवर, टमाटे, साखर, डेटॉल साबण, चहा पावडर आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष डॉ. श्रीराम लहामटे, दौलत बांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे, आनंदा कोरडे, शंकर साबळे, सुनील शहा, दीपेश छाजेड, श्याम शिंदे, भावका निगळे आदींनी आपल्या ग्रुपमधील सहकाºयांना घेत या आदिवासी वस्तीत भाजीपाला, किराणा अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. या आदिवासी कातकरी वस्तीत जवळपास तीस कुटुंबे वास्तव्य करतात. मासेमारी करून आपली उपजीविका भागवत असतानाच मध्येच कोरोनासारख्या विषाणूने जगभरात थैमान घातलं आणि रोज काम करणाºया अशा लाखो कुटुंबांचा रोजगार बंद झाला.

साताळीत हॅण्डवॉश वाटप

येवला : तालुक्यातील साताळी येथे कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामपंचायतीकडून केल्या जात आहे. सरपंच भाऊसाहेब कळसकर यांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन हॅण्डवॉशचे वाटप केले. यावेळी प्रत्येकाने घरी थांबणे, प्रवास टाळणे, हॅण्डवॉशने नेहमी हात धुऊन काळजी घेणे, तोंडाला नेहमी मास्क वापरणे आदीबाबत जनजागृतीही त्यांनी केली. या उपक्रमात ग्रामसेवक महेश महाले, पोलीसपाटील ज्योती काळे व आशा कार्यकर्ती सरला जाधव यांनीदेखील मोलाचे योगदान दिले.

Web Title: Food for the hungry .... That's our goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.