कळवणमध्ये पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:56 PM2020-09-15T23:56:57+5:302020-09-16T01:02:06+5:30

कळवण : शहर व तालुक्यात कोरोना रु ग्णाच्या आकड्याने शंभरी पार केली असून कळवण व अभोणा शहरात कोरोनाबाधिताची संख्या व दररोज रुग्ण आढळून येत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कळवण शहरात दि १६ ते २० सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

Five-day 'Janata Curfew' in Kalwan | कळवणमध्ये पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

कळवणमध्ये पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

Next

कळवण : शहर व तालुक्यात कोरोना रु ग्णाच्या आकड्याने शंभरी पार केली असून कळवण व अभोणा शहरात कोरोनाबाधिताची संख्या व दररोज रुग्ण आढळून येत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कळवण शहरात दि १६ ते २० सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात याच तारखेदरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता.
आमदार नितीन पवार यांच्या सूचनेनुसार कळवण व्यापारी महासंघाने याबाबत पुढाकार घेऊन अत्यावश्यक सेवा वगळता सर्वं व्यवसाय, व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी महासंघ बैठकीत घेण्यात आला. कळवण व्यापारी महासंघ, सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरपंचायत पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी एकत्र बैठक घेऊन जनता कर्फ्यूबाबत चर्चा करु न सर्वानुमते निर्णय घ्यावा, अशी सूचना आमदार नितीन पवार यांनी सोमवारच्या शासकीय अधिकारी व व्यापारी बांधव यांच्या बैठकीत केली होती.

त्यानुसार हरी ओम लॉन्स बैठकीत जनता कर्फ्यूवर शिक्कामोर्तब करण्यात आला. कळवण शहरातील नागरिक वा व्यापारी बांधवानी प्रशासनाला सहकार्य करु न दिशा निर्देशाचे पालन करु न जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले आहे.
जनता कर्फ्यू बैठकीत नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ सचिन पटेल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले नाहीतर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. जेष्ठ नेते रविंद्र देवरे, नंदकुमार खैरनार, राजेंद्र भामरे, मोहनलाल संचेती,नगरसेवक अतुल पगार विलास शिरोरे, दीपक महाजन, गंगाधर गुंजाळ, विजय जाधव, महेश महाजन यांनी जनता कर्फ्यू संदर्भात आपली भूमिका मांडली.
बैठकीला नगराध्यक्षा रोहिणी महाले, जितेंद्र पगार, निंबा पगार, दशरथ बच्छाव, प्रकाश संचेती, जितेंद्र कापडणे, नगरसेवक बाळासाहेब जाधव, नगरसेविका सुरेखा जगताप नितीन वालखडे , कुमार रायते , संदीप पगार, विनोद मालपुरे सागर खैरनार उमेश सोनवणे, सागर वाणी, मुन्ना काकुळते, स्वप्नील शिरोरे, भूषण शिरोरे शांताराम जाधव आदी उपस्थित होते.
दि 16ते 20 सप्टेंबर पर्यंत मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.जनता कर्फ्यूमध्ये मेडिकल व हॉस्पिटल वगळून बाकी सर्व सेवा बंद राहणार असून, शहरिहतासाठी शहरवासीयांनी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन आमदार नितीन पवार व सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, व्यापारी महासंघ यांनी केले आहे.

Web Title: Five-day 'Janata Curfew' in Kalwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.