नांदगावी आढळला पहिला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 10:41 PM2020-05-28T22:41:06+5:302020-05-29T00:14:28+5:30

लॉकडाउन सुरू झाल्यानंतर दोन महिने नांदगाव शहरात शिरकाव न झालेल्या कोरोनाने अखेर येथे पाऊल टाकले असून, पहिला पॉझिटिव्ह रु ग्ण शहरात आढळून आल्याने नगर परिषद प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सदर रुग्णाची गांभीर्याने दखल घेत तीन दिवसांचा पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

The first patient was found in Nandgaon | नांदगावी आढळला पहिला रुग्ण

नांदगावी आढळला पहिला रुग्ण

Next
ठळक मुद्देविलगीकरण सुरू : तीन दिवसांचा पूर्ण लॉकडाउन जाहीर

नांदगाव : लॉकडाउन सुरू झाल्यानंतर दोन महिने नांदगाव शहरात शिरकाव न झालेल्या कोरोनाने अखेर येथे पाऊल टाकले असून, पहिला पॉझिटिव्ह रु ग्ण शहरात आढळून आल्याने नगर परिषद प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सदर रुग्णाची गांभीर्याने दखल घेत तीन दिवसांचा पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
चार दिवस आधी शहरातील दोन महिलांना कोरोना संशयित म्हणून साकोऱ्याच्या सारतळे कोरोना केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. त्यापैकी एकीचा बुधवारी रात्री पॉझिटिव्ह अहवाल आला. अहवाल आल्यानंतर प्रशासनाने पहाटेच संबंधित भाग सील करण्यास सुरुवात करून कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी व विलगीकरण प्रक्रि या सुरू केली. उच्च धोका असलेल्या ७ जणांचे तातडीने विलगीकरण करण्यात आले असून, त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे. निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली आहे.
कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या घरापासून ३०० मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन व ५०० मीटरपर्यंत बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. सदर रु ग्णाच्या घराच्या आजूबाजूला फळ विक्र ेत्यांची गुदामे आहेत. आंबे व्यापार मालेगाव शहराशी निगडित आहे. माहितीनुसार कोरोनाग्रस्त महिलेचे वय ५५ असून ती भाजीपाला व फळे घेण्यासाठी बाजारात जात असे. त्यामुळे समुदाय हस्तांतरणाचा धोका आहे. दरम्यान बाहेगावाहून येणारे भाजीपाला व फळ विक्रेते शहरात अद्यापही येत असल्याची माहिती आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या शून्य असल्याने चौथ्या लॉकडाउनमध्ये नांदगाव शहराचा समावेश नॉन रेडझोनमध्ये करण्यात आला. त्यामुळे शहरात सर्व व्यवहार सुरु करण्याची परवानगी मिळाली. दरम्यान वारंवार मास्क वापरण्याचे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात येत होते. काही अपवाद वगळता नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांची सर्रास पायमल्ली केली. एरवी आठवडे बाजाराच्या दिवशी दिसणारी गर्दी गांधी चौकात दररोज दिसू लागली. पुढील तीन दिवस किराणा, मेडिकल, दवाखाने व दूध यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: The first patient was found in Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.