On the first day, 2 thousand entrance | पहिल्या दिवशी २ हजार प्रवेश
अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर नामांकित महाविद्यालयांमध्ये प्राधान्याने प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धावपळ उडाली. अनेक ठिकाणी महाविद्यालयाच्या प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदरच पालकांच्या रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देमिशन अ‍ॅडमिशन । पहिल्या यादीत १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांना संधी

नाशिक : अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी नाशकातील महाविद्यालयांमध्ये शनिवारी दिवसभर प्रवेशासाठी झुंबड उडाली होती. शुक्रवारी (दि. १२) पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ झाला.
पहिल्या यादीत कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी शाखेतील १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यापैकी शनिवारी पहिल्या दिवशी २ हजार ३८ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतले. त्यात विज्ञान शाखेत सर्वाधिक ९७० प्रवेश झाले. पहिल्या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवार (दि. १६) दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.
महानगरात सर्व शाखांमध्ये मिळून अकरावीच्या २३ हजार ८६० जागा उपलब्ध आहेत. शुक्र वारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत कला शाखेतील दोन हजार ५६३, वाणिज्य शाखेच्या ५ हजार ५२९, तर विज्ञान शाखेच्या ६ हजार ३९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. एचपीटी महाविद्यालयात विज्ञान शाखेचा कटआॅफ सर्वाधिक ९१ टक्के, तर बीवायके महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा ८७.८० टक्के कटआॅफ जाहीर झाला आहे.
पहिल्या गुणवत्ता यादीत प्रथम पसंतीक्र माचे महाविद्यालय मिळाले असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे, तर दुसरे ते दहाव्या पसंतीक्र माचे महाविद्यालय मिळाले असल्यास विद्यार्थी दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करू शकतात. पहिल्या गुणवत्ता यादीसाठी २५ हजार ६९० अर्ज आले होते. त्यातील १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड करण्यात आली आहे.
प्रवेशप्रक्रियेचा पुढील टप्पा
प्रवेश निश्चित करणे : १३ ते १६ जुलै.
दुसºया यादीसाठी जागांची माहिती : १७ जुलै
भाग १, २ मध्ये बदल : १७ व १८ जुलै
दुसरी गुणवत्ता यादी : २२ जुलै
प्रवेश निश्चित करणे : २३ ते २५ जुलै
तिसºया यादीसाठी माहिती : २५जुलै
भाग १, २ मध्ये बदल : २७ ते २९ जुलै
तिसरी गुणवत्ता यादी : १ आॅगस्ट
प्रवेश निश्चिती : २ ते ५ आॅगस्ट
विशेष यादीसाठीच्या जागा : ५ आॅगस्ट
अर्जात बदल प्रक्रिया : ६ व ७ आॅगस्ट
विशेष गुणवत्ता यादी : ९ आॅगस्ट
प्रवेश निश्चिती : १० ते १३ आॅगस्ट


Web Title: On the first day, 2 thousand entrance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.