...अखेर मुख्य संशयित असा अडकला जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 01:49 AM2020-02-17T01:49:40+5:302020-02-17T01:49:58+5:30

लासलगाव बसस्थानकावर घडलेल्या प्रकारानंतर मुख्य संशयित रामेश्वर व त्याच्या मामाने घटनास्थळावरून पलायन केले. भयभीत झालेल्या रामेश्वरने लासलगाव रेल्वेस्थानक गाठले. तेथून रेल्वेलाईननेच मजल-दरमजल करीत पायीच रात्री मनमाडला पोहचला. तेथे तो फलाटाबाहेर थांबला. त्यानंतर येवला तालुक्यातील मावसभावाच्या घराचा आसरा त्याने घेतला होता.

... Finally the main suspect is trapped | ...अखेर मुख्य संशयित असा अडकला जाळ्यात

महिला जळीत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयित रामेश्वर भागवत याच्यासह लासलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी.

Next

नाशिक : लासलगाव बसस्थानकावर घडलेल्या प्रकारानंतर मुख्य संशयित रामेश्वर व त्याच्या मामाने घटनास्थळावरून पलायन केले. भयभीत झालेल्या रामेश्वरने लासलगाव रेल्वेस्थानक गाठले. तेथून रेल्वेलाईननेच मजल-दरमजल करीत पायीच रात्री मनमाडला पोहचला. तेथे तो फलाटाबाहेर थांबला. त्यानंतर येवला तालुक्यातील मावसभावाच्या घराचा आसरा त्याने घेतला होता.
घटना घडल्यापासून लासलगाव पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेची तीन पथके रात्रभर रामेश्वरचा शोध घेत होती. त्याच्याकडे भ्रमणध्वनी नसल्याने त्याचा ठावठिकाणा समजणे जिकीरीचे झाले होते. तरीदेखील पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू होते. त्याच्या बऱ्याच नातेवाईकांकडे तपास करूनदेखील तो हाती लागत नव्हता. अखेरीस रविवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या पथकाला सुगावा लागताच येवला तालुक्यातील मावसभावाच्या घरातून रामेश्वर भागवत यास ताब्यात घेतले.

Web Title: ... Finally the main suspect is trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.