दुचाकीला लाथ मारून लांबविले पावणेदहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 11:23 PM2020-08-11T23:23:32+5:302020-08-12T00:01:18+5:30

नाशिक : कुरियरचे कार्यालय बंद झाल्यानंतर ग्राहकांसाठी वाटप करायची ९ लाख ७४ हजार रुपयांची रोकड घरी घेऊन जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रितम हरिभाऊ बागडे (३०, रा.गेंदालाल मिल, जळगाव) याच्या दुचाकीला लाथ मारुन रोकड असलेली बॅग लांबविल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजता जळगाव येथे घडली. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांकडून कमालीची गोपनीयता पाळली जात होती.

Fifteen lakh kicked off the bike | दुचाकीला लाथ मारून लांबविले पावणेदहा लाख

दुचाकीला लाथ मारून लांबविले पावणेदहा लाख

Next
ठळक मुद्देजळगाव येथील घटना : कुरियरची होती रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कुरियरचे कार्यालय बंद झाल्यानंतर ग्राहकांसाठी वाटप करायची ९ लाख ७४ हजार रुपयांची रोकड घरी घेऊन जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रितम हरिभाऊ बागडे (३०, रा.गेंदालाल मिल, जळगाव) याच्या दुचाकीला लाथ मारुन रोकड असलेली बॅग लांबविल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजता जळगाव येथे घडली. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांकडून कमालीची गोपनीयता पाळली जात होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम बागडे हा तरुण संत गोदडीवाला मार्केटमध्ये असलेल्या ‘क्विक कुरियर’ या फर्ममध्ये कामाला आहे. जितेंद्र सोमानी यांच्या मालकीची ही फर्म आहे. कुरियरचे काम असल्याने रोज ग्राहकांच्या पैशांची आवक जावक असते. सोमवारी कार्यालय बंद करण्यापूर्वी मालक सोमानी यांनी प्रितम याच्याकडे ९ लाख ७४ हजार रुपये दिले. ही रक्कम मंगळवारी ग्राहकांना वाटप करायची होती. प्रितम हा नेहमीच घरी जाताना बॅगमध्ये रक्कम टाकून नेत असायचा. त्याप्रमाणे सोमवारी कार्यालयातून दुचाकीने शनी पेठमार्गे निघाल्यानंतर प्रजापत नगर व शिवाजी नगराला लागून असलेल्या स्मशानभूमीजवळ दुचाकीवरून मागून दोन जण आले. त्यांनी प्रितमला थांबवून त्याच्याशी वाद घालून शिवीगाळ केली तर दुसऱ्याने त्याच्या दुचाकीला लाथ मारून रोकड असलेली बॅग घेऊन पलायन केले. घाबरलेल्या प्रितम याने आरडाओरड करून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही उपयोग झाला नाही.सीसीटीव्ही फुटेजमध्येही काही दिसेनाया घटनेनंतर प्रितम याने शहर पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच त्याला घेऊन घटनास्थळ गाठले. परिसरात चौकशी करून एका शोरुममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र तेथे काहीच दिसले नाही. प्रितम ज्या मार्गाने घरी गेला, त्यामार्गावरील दुकान व घरांचे सीसीटीव्ही तपासण्याचे काम रात्री १० वाजेपर्यंत सुरूहोते, परंतु काहीच हाती लागले नाही. शेवटी त्याला परत पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संशयितांचे वर्णन विचारुन माहिती काढली जात होती.पोलिसांकडून माहिती देण्यास नकार
या घटनेविषयी शहर पोलिसांना माहिती विचारली असता त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला. पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनीही गुन्हे शोध पथक चौकशी करीत आहेत, त्यात सत्यता किती, कुरियर चालकांकडे इतकी रक्कम कशी हा देखील चौकशीचा भाग असल्याचे सांंगितले.

Web Title: Fifteen lakh kicked off the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.