जिल्ह्यातील पंधरा धरणे १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:47 AM2019-09-16T00:47:59+5:302019-09-16T00:48:15+5:30

मागील वर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यात यंदा वरुण राजाची कृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्यातील धरणे समृद्ध झाली आहेत. यंदा झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पंधरा धरणांचा पाणीसाठा सप्टेंबरमध्ये १०० टक्के झाला आहे.

Fifteen dams in the district, 3 percent | जिल्ह्यातील पंधरा धरणे १०० टक्के

जिल्ह्यातील पंधरा धरणे १०० टक्के

Next

नाशिक : मागील वर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यात यंदा वरुण राजाची कृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्यातील धरणे समृद्ध झाली आहेत. यंदा झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पंधरा धरणांचा पाणीसाठा सप्टेंबरमध्ये १०० टक्के झाला आहे.
जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण पाणीसाठा ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याने जिल्ह्यासाठी ही समाधानाची बाब मानली जात आहे. मागीलवर्षी जिल्ह्यातील एकूण साठा केवळ ७९ टक्के इतका होता. आता प्रकल्पांमधील पाणीसाठा १०० टक्के होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, गंगापूर धरणातून १७०८ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर दारणामधून २७०८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काश्यपी, गौतमी, आळंदीमधून सुद्धा पाण्याचा विसर्ग होत आहे.

Web Title: Fifteen dams in the district, 3 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.