कसबे सुकेणेला तप महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 06:18 PM2019-08-20T18:18:45+5:302019-08-20T18:19:20+5:30

कसबे सुकेणे येथील जैन श्रावक संघात चातुर्मास निमित्त प.पु. म्हाश्वेताजी म.सा.यांचे सानिध्यात तप पूर्ती केलेल्या बांधवांची शोभायात्रा कसबे सुकेणे येथे नुकतीच काढण्यात आली-

Festival of Tuberculosis Dryness | कसबे सुकेणेला तप महोत्सव

कसबे सुकेणे येथे जैन श्रावक संघात चातुर्मास निमित्त प.पु. म्हाश्वेताजी म.सा.यांचे स्वागत करतांना जैन समाज बांधव.

Next

कसबे सुकेणे : येथील जैन श्रावक संघात चातुर्मास निमित्त प.पु. म्हाश्वेताजी म.सा.यांचे सानिध्यात तप पूर्ती केलेल्या बांधवांची शोभायात्रा कसबे सुकेणे येथे नुकतीच काढण्यात आली-
गेल्या पंचेचाळीस वर्षांत प्रथमच चातुर्मास मध्ये 31 उपवास (मासखमन)सौ.सुरेखा ललित गांधी यांनी पुर्ण केले व सौ.मनीषा महेंद्र गुंदेचा 9 उपवास व अक्षर मनोज गांधी याने 8 उपवास पूर्ण केले- यानिमित्ताने कसबे सुकेणे श्री श्रावक संघ यांच्यावतीने उपवासकर्त्या बांधवांची शहरातून वाजत गाजत लेझीम पथकासह भव्य मिरवणूक (वरघोडा)इकाढण्यात आला . श्रावक संघाचे अध्यक्ष ललित
गांधी व महामंत्री आनंद गांधी तसेच चातुर्मास कमिटी ,गौतम प्रसादीचे मानकरी दगडूशेठ गांधी आदी उपस्थित होते- याप्रसंगी कसबे सुकेणे शहरातील जैन समाजातील मान्यवर , व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Festival of Tuberculosis Dryness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.