मेथीची भाजी होतेय कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 03:39 PM2019-12-31T15:39:19+5:302019-12-31T15:40:38+5:30

सद्या बाजारात मेथीच्या भाजीची आवक मुबलक प्रमाणात होत आहे. त्यामुळे जुडीला पाच रु पये तर काही वेळा दहा रु पयात तीन जुडयाही विकल्या जातात.

Fenugreek is a vegetable | मेथीची भाजी होतेय कवडीमोल

मेथीची भाजी होतेय कवडीमोल

googlenewsNext
ठळक मुद्देजुडीला पाच रु पये तर काही वेळा दहा रु पयात तीन जुडयाही विकल्या जातातएकलहरे, हिंगणवेढे, जाखोरी शिवारात मोठ्या प्रमाणात मेथीची लागवड

नाशिक : सद्या बाजारात मेथीच्या भाजीची आवक मुबलक प्रमाणात होत आहे. त्यामुळे जुडीला पाच रु पये तर काही वेळा दहा रु पयात तीन जुडयाही विकल्या जातात. एकलहरे, हिंगणवेढे, जाखोरी शिवारात मोठ्या प्रमाणात मेथीची लागवड केल्याने व्यापारी थेट बांधावरच मेथी खरेदीसाठी येऊ लागले आहेत.
      काही शेतकऱ्यांनी एक दोन एकरचे क्षेत्रात मेथीचे पिक घेतले होते. सुमारे दिड महिन्यात मेथीचे पिक हाती येत असल्याने भाव असला तर शेतकऱ्यांना पैसा मिळतो. मात्र सद्या मेथीला भावच नसल्याने मेथी काढून, जुड्या बांधून मार्केटला नेण्याचा खर्चही शेतकºयांना परवडत नाही. त्यामुळे हिंगणवेढे येथील एका शेतकºयाने चक्क अर्धा एकर क्षेत्रात असलेली मेथी एक एजार रु पयात विकली. मात्र यामुळे लागवडीसाठी लागणारा खर्चही यातून न निघाला नाही.

Web Title: Fenugreek is a vegetable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.