संभाव्य लॉकडाऊनची भीती; स्वस्तात द्राक्ष खरेदीची नीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:45 PM2021-02-23T22:45:09+5:302021-02-24T00:53:48+5:30

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या एडिट ऑडिओ व बातम्यांच्या अफवांचे संदेश फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत असून या अफवांमुळे शेतकरी आपला शेतमाल मिळेल त्या कवडीमोल भावात विकताना दिसत आहेत. त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांकडून या अफवांना प्रोत्साहन दिले जात असून शेतकऱ्याला लॉकडाऊनची भीती दाखवत द्राक्ष माल खरेदी केला जात आहे .

Fear of possible lockdown; Strategies to buy cheap grapes | संभाव्य लॉकडाऊनची भीती; स्वस्तात द्राक्ष खरेदीची नीती

संभाव्य लॉकडाऊनची भीती; स्वस्तात द्राक्ष खरेदीची नीती

Next
ठळक मुद्देअफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांनाच.

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या एडिट ऑडिओ व बातम्यांच्या अफवांचे संदेश फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत असून या अफवांमुळे शेतकरी आपला शेतमाल मिळेल त्या कवडीमोल भावात विकताना दिसत आहेत. त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांकडून या अफवांना प्रोत्साहन दिले जात असून शेतकऱ्याला लॉकडाऊनची भीती दाखवत द्राक्ष माल खरेदी केला जात आहे .

जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ कडक निर्बंध होते. त्यामुळे जनसामान्यांसह सर्व क्षेत्रातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सर्वांनी काटेकोरपणे नियम पाळल्याने हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. सर्व सुरळीत झाले.

त्या आर्थिक संकटातून सगळे सावरू लागले असताना पुन्हा एकदा त्याचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे नियमित मास्क वापरा ,गर्दीची ठिकाणे टाळा, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, रात्रीची संचारबंदी, सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी आदी निर्देश शासनाकडून दिले जात आहेत. मात्र पुन्हा पहिल्यासारखे कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरविणाऱ्या खोट्या बातम्या, एडिट केलेले ऑडिओ सोशल मीडिया माध्यमातून पसरवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी,मजूर कामगार, गोरगरीब नागरिकांची धास्ती वाढली. पुन्हा पहिल्यासारखे लॉकडाऊन झाले तर काय परिस्थिती होणार याचा विचार करीत शेतकरी आपला शेतमाल कवडीमोल भावात विकू लागला आहे .कामगार, मजूर, नोकरदार हे पुन्हा बेरोजगार होणार ही भीती वाढली आहे. त्यामुळे या अफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांचाच बसणार आहे.

लॉकडाऊनच्या अफवांमुळे शेतकरी, दुकानदार ,बांधकाम मजूर, नोकरदार या प्रत्येकाला याचा फटका बसणार आहे. त्यातच मजूर व नोकरदार वर्गाचे पेमेंट अडवले जात असून त्यातही कपात केली जात आहे. कामावरून काढून टाकण्याचे दम भरले जात आहेत. या अफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांचाच बसणार आहे त्यामुळे अफवा पसरवणे टाळावे आणि प्रशासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचे पीक मातीमोल केले आणि त्यात आता कोरोनाच्या लॉकडाऊनच्या अफवेची भीती यात व्यापाऱ्यांचाही फायदा होणार आहे. पुन्हा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याच्या षडयंत्राला द्राक्ष उत्पादक बळी पडत आहेत.
- अजय गवळी, द्राक्ष उत्पादक

Web Title: Fear of possible lockdown; Strategies to buy cheap grapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.