उन्हाळी कांदा उत्पादन घटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:50 PM2021-04-08T18:50:00+5:302021-04-08T18:50:45+5:30

उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

Fear of declining summer onion production | उन्हाळी कांदा उत्पादन घटण्याची भीती

ऐन गळतीवेळी उन्हाळी कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Next
ठळक मुद्देकरपा रोगाचा प्रादुर्भाव : पाणीटंचाईमुळेही होणार परिणाम

उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

उन्हाळी कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना चालू वर्षी बियाणे मिळविण्यापासून ते रोपे टाकणीपर्यंत व लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी सुरुवातीस बहुतांश शेतकऱ्यांजवळ घरगुती बियाणे असल्याने लवकर रोपे तयार व्हावीत, यासाठी लवकर बियाणे पेरणी केली होती. मात्र त्या वेळेस सततच्या पावसामुळे ही रोपे उगवण्याआधीच खराब झाली होती. परिणामी दुसऱ्यांदा रोपे तयार करण्यासाठी घरगुती बियाणे शिल्लक नसल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे बियाणे मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली होती; परंतु बहुतांश कंपनीचे बियाणे खराब निघाल्याने उगवण क्षमतेवर परिणाम होऊन लागवडीवर याचा विपरीत परिणाम झाला होता. या परिस्थितीवर मात करीत कशाबशा लागवडी पूर्ण केल्या. मात्र, उन्हाळी कांदे म्हणून लागवड केलेले बहुतांश कांदे लाल निघाल्याने उन्हाळी कांद्यांचे क्षेत्र आपसूकच कमी झाले. त्यानंतर उर्वरित उन्हाळी कांदा पीक जोमात असताना गेल्या तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. या संकटातून काहीअंशी वाचलेल्या कांद्यांचे उत्पादन तरी पदरात पडेल अशी अपेक्षा असतानाच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे ऐन गळतीच्या उंबरठ्यावर असलेल्या कांदा पिकावर अवघ्या आठ दिवसांतच करपा रोगाने थैमान घातले आहे.

उशिरा झालेल्या लागवडीमुळे ऐन कांदा काढणीच्या महिनाभर आधीच विहिरींनी तळ गाठल्याने कमी चालू वर्षी उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बियाणे, तणनाशके, रासायनिक खते, लागवड, निंदणी, कांदा काढणी, आदींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. असे असतानाच ऐन कांदा गळतीवेळी अवकाळी पाऊस व करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. परिणामी हा कांदा बाधित झाल्याने चाळीत साठवणुकीऐवजी विक्री करावा लागणार आहे.
- संभाजी देवरे, शेतकरी

कांद्याची प्रतवारी घसरली
मागील वर्षी उन्हाळी कांद्यांचे उत्पादन चांगले असल्याने सुरुवातीस कमी बाजारभावाअभावी बहुतांश शेतकऱ्यांनी आगामी काळात भाव मिळेल या अपेक्षेपोटी कांदा माल चाळींमध्ये साठवणूक केला होता. मात्र या वर्षी ऐन कांदा गळतीवेळी बहुतांश ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शिवाय करपा रोग व नंतर पाणीटंचाई, आदी कारणांमुळे उत्पादनात काही अंशी घट येण्याची शक्यता असून, कांद्यांची प्रतवारी घसरल्याने चाळींमध्ये कांदा साठवणुकीवरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे मत शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 

Web Title: Fear of declining summer onion production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.