Nashik ST Accident Video: ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात, ST बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार, १० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 01:31 PM2022-12-08T13:31:58+5:302022-12-08T14:27:39+5:30

Nashik ST Accident : अपघातानंतर घटनास्थळावरच बसला भीषण आग लागली. त्यामध्ये बस संपूर्ण जळून राग झाली बसमधील काही प्रवाशांचा होरफळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Fatal accident of ST brake failure in nashik, bus burnt, 4 to 5 people killed | Nashik ST Accident Video: ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात, ST बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार, १० जखमी

Nashik ST Accident Video: ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात, ST बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार, १० जखमी

googlenewsNext

अझहर शेख

नाशिक -  नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक रोडपासून तीन किमी अंतरावर भीषण अपघाताची Nashik ST Accident घटना घडली. येतील शिंदे पळसे गावाच्या हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचे ब्रेक फेल झाल्याने बसने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण २ जणांचा  मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे.  आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घघटना घडली असून नाशिक शहरापासून केवळ ६ ते ७ किमी अंतरावरील हा अपघात आहे. 

अपघातानंतर घटनास्थळावरच बसला भीषण आग लागली. त्यामध्ये बस संपूर्ण जळून राग झाली बसमधील काही प्रवाशांचा होरफळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेनंतर अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका दाखल झाली असून आठ ते दहा लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारसाठी करण्यात आले आहे. जखमींवर बिटको हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून बघ्यांचीही गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. 

बस अपघातात जखमी झालेल्या राजगुरू नगर-नाशिक बस मधील प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे

हर्षदा मंगेस पोंदे, संगमनेर
रुपाली सचिन दिवटे, अकोले
समृद्धी सचिन दिवटे
सईदा इनामदार, संगमनेर
मुस्तफा शेख, संगमनेर
नसमा जहाँगिरदार, संगमनेर
औवेस अहमद, धारावी मुंबई
सिताराम देवराम कुरणे, सिकर 

या सर्व प्रवाशांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

 

Read in English

Web Title: Fatal accident of ST brake failure in nashik, bus burnt, 4 to 5 people killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.