खेड्यांमधील फार्महाउस गुन्हेगारांचे आश्रयस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 11:48 PM2020-01-16T23:48:51+5:302020-01-17T01:12:41+5:30

ग्रामीण भागातील फार्महाउसचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी दिवसेंदिवस वाढू लागल्याने गावकऱ्यांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरामधील राजकीय वरदहस्त मिळालेल्या गुंडांचे आश्रयस्थान गावांमधील फार्महाउस बनू लागल्याचे दरी-मातोरीच्या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. अपुºया कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांचे यावर नियंत्रण नसल्यानेच गावकु सात गुन्हेगारी फोफावू लागल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

Farmhouse Criminals' Shelter in the Village | खेड्यांमधील फार्महाउस गुन्हेगारांचे आश्रयस्थान

खेड्यांमधील फार्महाउस गुन्हेगारांचे आश्रयस्थान

googlenewsNext


ग्रामस्थ मेटाकुटीस : पोलिसांचे नियंत्रण नसल्याने फोफावतेय गुन्हेगारी

गंगापूर : शहराजवळच्या ग्रामीण भागातील फार्महाउसचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी दिवसेंदिवस वाढू लागल्याने गावकऱ्यांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरामधील राजकीय वरदहस्त मिळालेल्या गुंडांचे आश्रयस्थान गावांमधील फार्महाउस बनू लागल्याचे दरी-मातोरीच्या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. अपुºया कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांचे यावर नियंत्रण नसल्यानेच गावकु सात गुन्हेगारी फोफावू लागल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
शहराजवळच असलेल्या गंगापूर, गोवर्धन, चांदशी, दरी, मातोरी, मखमलाबाद, गिरणारे, कश्यपी धरण परिसर, धोंडेगाव, गंगापूर धरण परिसर, महादेवपूर, जलालपूर, सावरगाव, गंगाव्हरे आदी भागात कॉटेज हाउस, फार्म हाउस, हॉटेल्स, रिसॉर्ट, ढाबे उभे राहिले आहेत. यापैकी बहुतांश रिसॉर्टसह फार्महाउसमध्ये अवैध प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे गावकºयांकडून अनेकदा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले जाते; मात्र नव्याचे नऊ दिवस उलटल्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे-थे’ होत असल्याने जणू पोलिसांसाठीदेखील हे अर्थाजनचे साधनच झाले आहे की काय? अशी शंकाही उपस्थित होत आहे. शेतातील घर अशा संकल्पनेतून फार्महाउस साकारले जात असले, तरी निर्जन आणि लोकवस्तीच्या काही अंतर दूर असलेल्या फार्महाउसचा वापर नको त्या कामांसाठी सर्रासपणे केला जात आहे. शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांची, उद्योजकांची, व्यावसायिकांची फार्महाउस आहेत. फार्महाउसच्या दिशेने महिना-दोन महिन्यांतून मोटारींचा ताफा येऊन धडकतो.
गुन्हेगार फार्महाउसमध्ये घेतात विश्रांती
पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले आरोपी भूमिगत होण्यासाठी गावकुसांमधील ‘बड्या’ फार्महाउसचा आधार घेतात. शहरी भागात जबरी लूट, खून, दरोडे, दंगलीसारखे गंभीर गुन्हे केल्यानंतर अटक टाळण्यासाठी राजकीय व्यक्तींच्या पायाशी लोटांगण घालत भूमिगत होण्यासाठी थेट मोठ्या लोकांचे फार्महाउस वशिल्याने मिळवित असल्याची चर्चाही गावांच्या वेशींवर ऐकू येऊ लागली आहे.

फार्महाउस की डान्स बार ?
शांत, नीरव वातावरण असलेल्या शहराजवळच्या खेड्यांमध्ये फार्महाउसमधून रात्री-बेरात्री अचानकपणे डीजेचा दणदणाट ऐकू येतो. याबाबत गावकरी पोलिसांना माहितीही कळवितात, मात्र कारवाई केवळ फार्स ठरत असल्याने शेतकरीवर्गात नाराजी व्यक्त होत आहे. मोठ्या शहरांतील डान्स बारमधील छमछम थेट गावकुसातील फार्महाउसपर्यंत येऊन पोहचल्याचेही गावकºयांनी सांगितले. सर्रासपणे महिला, तरुण-तरुणी चमचम करणाºया मोटारींमधून येत रात्रीच्या वेळी धिंगाणा घालतात यामधूनच गुन्हेगारी वाढीस लागत असल्याचे गावकºयांनी सांगितले.

Web Title: Farmhouse Criminals' Shelter in the Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.