शेतकऱ्यांचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:38 AM2020-01-13T01:38:20+5:302020-01-13T01:38:39+5:30

मखमलाबाद येथील हरित विकास प्रकल्पाला शेतकºयांचा असलेला विरोध कायम असून, रविवारी झालेल्या बैठकीत विरोध करणाºया शेतकºयांची संख्या अधिक वाढल्याचा दावा करण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असून, शेतकरी यात पुरता अडकण्याची शक्यता असल्याने पालिकेने सुचविलेल्या सूत्रालादेखील विरोध दर्शविण्यात आला आहे.

Farmers' opposition persisted | शेतकऱ्यांचा विरोध कायम

शेतकऱ्यांचा विरोध कायम

Next
ठळक मुद्देहरित विकास प्रकल्प : मखमलाबादला शेतकऱ्यांची बैठक; कायदेशीर सल्ला घेणार

नाशिक : मखमलाबाद येथील हरित विकास प्रकल्पाला शेतकºयांचा असलेला विरोध कायम असून, रविवारी झालेल्या बैठकीत विरोध करणाºया शेतकºयांची संख्या अधिक वाढल्याचा दावा करण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असून, शेतकरी यात पुरता अडकण्याची शक्यता असल्याने पालिकेने सुचविलेल्या सूत्रालादेखील विरोध दर्शविण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात मखमलाबाद येथे स्मार्ट नगरीची संकल्पना आखण्यात आलेली आहे. ३०६ हेक्टर क्षेत्रात हा प्रकल्प साकारण्यात येणार असून यासाठी शेतकºयांच्या जमिनी लागणार आहेत. या प्रकल्पामुळे शेतकºयांना लाभ होण्याऐवजी नुकसानच होणार असल्याने तसेच अनेक तांत्रिक मुद्द्यांचा अजूनही उलगडा स्मार्ट सिटी कंपनीने केला नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. येथील सर्वेक्षणानंतर महापालिकेने शेतकºयांना ५५.४५ असे जागावाटपाचे हिस्से देण्यास तत्त्वत: मान्यता दिलेली आहे. परंतु याबाबत कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचा शेतकºयांना फटका बसणार असल्याचा सूर बैठकीत उमटला. शेतकºयांच्या क्षेत्रबदलाचा घोळदेखील असल्याने असलेल्या क्षेत्रापैकी दुसरीकडे क्षेत्र दाखविण्यात आल्याने त्याबाबतचा उलगडा करावा, अशी मागणी करण्यात आली.
प्लॉटवर बांधकाम करायचे झाल्यास ५० टक्के जागा सोडावी लागेल तरच परवाना मिळणार आहे. शिवाय बहुमजली इमारतीच्या बांधकामाच्या इमल्यानुसार पार्किंगसाठीचे नियोजन करावे लागणार असल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकºयांना बसणार असल्याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली. हरित विकास प्रकल्पातील अनेक मुद्दे हे फसवे असल्याने आणि भविष्यात आणखी अटी टाकल्या जातील याविषयी अनेक शेतकºयांनी शंकादेखील उपस्थितीत केली. या प्रकल्पासंदर्भातील अटींची संदिग्धता कायम आहेच, शिवाय अनेक फसवे मुद्दे असल्याचा आरोप शेतकºयांनी केला असून, याप्रकरणी विरोध कायम असल्याचा ठराव करण्यात आला.
दरम्यान, स्मार्ट सिटीच्या या प्रकल्पाला होणारा विरोध कायम असून, विरोध करणाºया शेतकºयांची संख्यादेखील वाढल्याचा दावा शेतकºयांनी केला आहे. या प्रकल्पामुळे शेतकºयांचे नुकसानच होणार असल्याचे आता अन्य शेतकºयांना पटल्याने तेदेखील विरोधात असल्याचे विरोधक शेतकºयांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार ‘प्रेझेंटेशन’
स्मार्ट सिटी प्रकल्पांसंदर्भात शेतकºयांचे मन वळविण्यासाठी सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार आता शेतकरी संभाव्य नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर ‘पॉवर प्रेझेंटशन’ सादर करणार आहे. यासंदर्भातील निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकºयांच्या क्षेत्राचे नुकसान होणार आहेच, शिवाय त्यांच्यावरील निर्बंधामुळे शेतकरी अधिक संकटात साडणार असल्याचा दावा शेतकºयांनी केला असून, याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यासंदर्भात त्यांची भेट घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

Web Title: Farmers' opposition persisted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.