दिल्लीतील शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत ;सदाभाऊ खोत यांचा आरोप :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 02:57 PM2020-12-04T14:57:33+5:302020-12-04T15:00:42+5:30

नाशिक : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात काही लोक राजकीय हेतून गैरसमज पसरवत असून दिल्लीतील शेतकरी आंदोलनही अशाच ...

The farmers' movement in Delhi was politically motivated; | दिल्लीतील शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत ;सदाभाऊ खोत यांचा आरोप :

दिल्लीतील शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत ;सदाभाऊ खोत यांचा आरोप :

Next
ठळक मुद्दे केंद्र सरकारचे कृषी विधेयक शेतकरी हिताचे रयत क्रांती संघटनेचे कृषी विधेयकांना समर्थन ६ डिसेंबरला आझाद मैदनावर समर्थनात निदर्शने

नाशिक : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात काही लोक राजकीय हेतून गैरसमज पसरवत असून दिल्लीतील शेतकरी आंदोलनही अशाच प्रकारे राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचा आरोप माजी कृषी राज्य मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी (दि.४) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचप्रमाणे या तिनही कायद्यांचे समर्थन करण्यासाठी ६ डिसेंबरला रयत क्रांती संघटना आझाद मैदानावर निदर्शनेही करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीनही कृषी उत्पादन व व्यापार विषयक विधेयके हे शेतकरी हिताची आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती तथा हमीभाव खरेदी केंद्र यंत्रणेला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही, उलट शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवाराबाहेरही त्यांचा कृषी माल विकण्याचे विविध पर्याय निर्माण होतील. परंतुकेंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीनही कृषी उत्पादन व व्यापार विषयक विधेयके हे शेतकरी हिताची असून त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती तथा हमीभाव खरेदी केंद्र यंत्रणेला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही, उलट शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवाराबाहेरही त्यांचा कृषी माल विकण्याचे विविध पर्याय निर्माण होतील अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: The farmers' movement in Delhi was politically motivated;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.