देशमाने येथील शेतकरी पिक पंचनाम्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 04:51 PM2020-10-06T16:51:32+5:302020-10-06T16:52:29+5:30

देशमाने : गाव व परिसरात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अति पावसामुळे कांद्याची रोपे, नव्याने केलेल्या कांदा लागवडीसह इतर खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, असे असतांना देखील देशमाने बुद्रुक व खुर्द येथील शेतकरी अद्यापही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहे.

Farmers in Deshmane waiting for crop panchnama | देशमाने येथील शेतकरी पिक पंचनाम्याच्या प्रतीक्षेत

देशमाने येथील शेतकरी पिक पंचनाम्याच्या प्रतीक्षेत

googlenewsNext
ठळक मुद्देपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

देशमाने : गाव व परिसरात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अति पावसामुळे कांद्याची रोपे, नव्याने केलेल्या कांदा लागवडीसह इतर खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, असे असतांना देखील देशमाने बुद्रुक व खुर्द येथील शेतकरी अद्यापही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहे.
उपविभागीय दंडाधिकारी सोपान कासार यांच्या आदेशानुसार तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांना देण्यात आलेले आहे. देशमाने बुद्रुक व खुर्द येथे पंचनाम्यासाठी ग्रामसेवकांची नेमणूक केलेली आहे. मात्र ग्रामसेवक संघटनेने कृषी, महसूल व ग्रामसेवक यांनी एकीत्रतपणे पंचनामे करावे अशी मागणी ग्रामसेवक संघटने केली होती. मात्र तीनही खात्याच्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र गाव देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने ग्रामसेवक संघटनेने बहिष्कार घातल्याने नुकसानग्रस्त शेतकरी यात हकनाक भरडला जात आहे.
अगोदरच अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला असताना या सुलतानी संकटाने आता संतप्त झाला आहे. तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

महसूल, कृषी व पंचायत समिती तीनही खात्याचा अधिकारी, कर्मचारी यांच्या एकत्रित बैठकीत पीक पंचनामे संयुक्तरित्या करण्याचे मान्य करण्यात आले होते. असे असताना स्वतंत्र गाव कर्मचाऱ्यांना देण्यात आले. यात ग्रामसेवक यांना शेतीबाबत कुठलीच माहिती नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. संयुक्तरित्या पंचनामे केल्यास ते अधिक परिणामकारक ठरू शकते. म्हणून हा बहिष्कार घातला आहे. परंतु शेतकरी वर्गाची अडचण होऊ नये म्हणून आम्ही पंचनामे करणार आहे.
- रवींद्र शेलार, सचिव, नाशिक जिल्हा, ग्रामसेवक संघटना.

Web Title: Farmers in Deshmane waiting for crop panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.