किसान कॉँग्रेसचे शेतकरीप्रश्नी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:47 PM2020-01-23T22:47:23+5:302020-01-24T00:33:27+5:30

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शासनाने जाहीर केलेले हेक्टरी ८ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, यासंदर्भातील मागणीचे निवेदन येवला तालुका किसान कॉँग्रेसच्यावतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना देण्यात आले.

Farmers' Congress Farmers Question Statement | किसान कॉँग्रेसचे शेतकरीप्रश्नी निवेदन

येवला तालुका कॉँग्रेसच्यावतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष शरद लोहकरे यांचेसह पदाधिकारी.

Next

येवला : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शासनाने जाहीर केलेले हेक्टरी ८ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, यासंदर्भातील मागणीचे निवेदन येवला तालुका किसान कॉँग्रेसच्यावतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना देण्यात आले.
तालुका अध्यक्ष शरद लोहकरे व पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शासनाने जाहीर केलेले अनुदान तालुक्यातील काही प्रमाणत शेतकऱ्यांना मिळाले असले तरी अद्यापही बरेच शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.
सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना सदर अनुदान लवकर मिळल्यास त्याचा शेतीसाठी उपयोग होईल. यावेळी उपाध्यक्ष गणेश आहेर, आबाराजे शिंदे, बाळासाहेब गरुड, भागवत जाधव, चांगदेव माळी, शिवराम वाघचौरे, दिगंबर पेढरे, भगवान जाधव, धनजंय पैठणकर, गणपत खैरनार आदी उपस्थित होते.

Web Title: Farmers' Congress Farmers Question Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप