कुटुंब प्रबोधन ही काळाची गरज :  मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:52 AM2019-11-24T00:52:12+5:302019-11-24T00:52:43+5:30

स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या गोळे कॉलनीतील समिती कार्यालयास सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट दिली. मातृशक्तीची प्रतिष्ठा जपत असताना कुटुंब प्रबोधन आवश्यक असल्याचे मत या भेटीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

 Family awareness is the need of the hour: Mohan Bhagwat | कुटुंब प्रबोधन ही काळाची गरज :  मोहन भागवत

कुटुंब प्रबोधन ही काळाची गरज :  मोहन भागवत

Next

नाशिक : स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या गोळे कॉलनीतील समिती कार्यालयास सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट दिली. मातृशक्तीची प्रतिष्ठा जपत असताना कुटुंब प्रबोधन आवश्यक असल्याचे मत या भेटीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
यावेळी भागवत यांनी, जगत-जननी, प्रकृती पुरुष ही निसर्गरचना आहे. आपल्या संस्कृतीची सर्वजण समान अशी भावना आहे. अनेक परकीय आक्रमणांनी ती लोप पावली. कुटुंबसंस्था संरक्षण करण्यासाठी कुटुंबप्रबोधन करण्याची गरज आहे, असा विचार समितीच्या सेविकांसमोर मांडला. सरसंघचालकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थेत देवी अष्टभुजेचे दर्शन घेतले. सभागृहात लावलेली प्रदर्शने बघितली. संस्थेच्या ज्येष्ठ सभासद भानूताई गायधनी यांनी संस्थेच्या वतीने राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी माजी आमदार निशिगंधा मोगल यांनी मनोगत व्यक्त केले
संस्था परीचय शोभा गोसावी यांनी करून दिला. गीता कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील राष्ट्रसेविका समितीच्या शाखेबद्दल माहिती दिली. अ‍ॅड. शोभा गोसावी यांनी प्रतिष्ठानची माहिती सांगितली. गीता कुलकर्णी यांनी नाशिक जिल्ह्यातील कामाची माहिती दिली. विद्या चिपळूणकर, डॉ. शुभांगी कुलकर्णी, मंगला सौंदाणकर आदी उपस्थित होत्या.
महिलांसाठी कार्यरत केंद्र
राणी लक्ष्मी भवन १९५८ पासून महिला उद्योग केंद्र चालविले जात आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह, लहान मुलांसाठी बालवाडी, पाळणाघर सुद्धा चालविले जाते. त्याशिवाय महिलांसाठी भजनी वर्ग, पौराहित्य वर्ग घेतले जातात. सेवा कार्य म्हणून रु ग्णोपयोगी साहित्य केंद्र व सहायता निधी, शैक्षणिक निधी सहायता आणि अन्नदान योजना कार्यरत आहे. संस्थेतर्फे नाशिक जिल्ह्यातील शौर्य दाखविणाºया महिलेला दरवर्षी महिला शौर्य पुरस्कार दिला जात असल्याचीही माहिती यावेळी भागवत यांना देण्यात आली.

Web Title:  Family awareness is the need of the hour: Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.