जिल्हाधिका-यांच्या नावाने बनावट संदेश व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:30 PM2020-09-21T23:30:17+5:302020-09-22T01:08:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक - कोरोना काळात काळजी घेण्यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या नावाने पुन्हा एक बनावट मॅसेज सोशल ...

Fake message in collector's name goes viral | जिल्हाधिका-यांच्या नावाने बनावट संदेश व्हायरल

जिल्हाधिका-यांच्या नावाने बनावट संदेश व्हायरल

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे स्पष्टीकरण: वृत्तपत्र हेच कोरोनाकाळातील खरे मित्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक - कोरोना काळात काळजी घेण्यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या नावाने पुन्हा एक बनावट मॅसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यात कोरोना विषयी भीती आणि अत्यंत गैरसमज पसरविणारी माहिती आहे. त्यामुळे अशा बनावट मॅसेज मधील आवाहनांना बळी पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. विशेषत: शासन- प्रशासन आणि जनता यांच्यात दुवा साधण्याचे काम वृत्तपत्र करीत आहेत. त्यामुळे कोरोना काळात हेच खरे मित्र असल्याचे ही प्रशासनाच्या पत्रकात म्हंटले आहे.
‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयांच्या नावाने नाशिकसह विभागातील अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार या जिल्'ांत व्हाट्स अ­ॅप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक लोक पसरवत आहेत. त्यात प्रामुख्याने आपल्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तु बंद करणे, त्यांच्या हाताळणी, बाळगणे व काळजी घेण्याबरोबरच वृत्तपत्रांबाबत देखील संभ्रम निर्माण करणारी माहिती पसवरली जात आह. वृत्तपत्रा संदर्भात
अशास्त्रीय व अशुद्ध, निराधार माहिती देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने देखील वृत्तपत्र ही पूर्णपणे सुरक्षित आणि कोरोनामुक्त असल्याचे सांगितले आहे.
या संकटकाळात माणसांमध्ये सकारात्मक जाणिवा निर्माण करण्याचे काम देखील ते करत आहेत. वृत्तपत्र हेच समाजाचे मित्र आहेत. माझे कुटूंब व माझी जबाबदारी मोहिमेत जबाबदार कुटूंबाचे घटक म्हणून आफवांना बळी न पडता वृत्तपत्र नियमित वाचायला हवीत, असे आवाहन नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक रणजितसिंह राजपूत यांनी केले आहे.
यापूर्वी लॉकडाऊन काळात अशाच प्रकारे जिल्हाधिका-यांच्या नावाने बनावट मॅसेज व्हायरल झाल्याने यासंदर्भात पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आली. त्याचा शोध सुरू असून आताही अशाच प्रकारे पुन्हा बनावट संदेश व्हायरल होत असल्याने जिल्हा प्रशासनाने हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.

 

Web Title: Fake message in collector's name goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.