बेदाणे उत्पादक शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 10:16 PM2020-04-02T22:16:07+5:302020-04-02T22:16:21+5:30

द्राक्ष शेतीबरोबर जोडधंदा म्हणून बेदाणे निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र, अवकाळी, बेमोसमी पाऊस यासह आता कोरोना विषाणूचा परिणाम द्राक्षशेती व बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Extremely productive farmers are scared | बेदाणे उत्पादक शेतकरी धास्तावले

बेदाणे उत्पादक शेतकरी धास्तावले

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : शासनाने उपाययोजना करण्याची मागणीे

दिंडोरी : तालुक्यात द्राक्ष शेतीबरोबर जोडधंदा म्हणून बेदाणे निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र, अवकाळी, बेमोसमी पाऊस यासह आता कोरोना विषाणूचा परिणाम द्राक्षशेती व बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील शेतकरी दीपक गायकवाड व संतोष गायकवाड अनेक वर्षांपासून बेदाणे उत्पादनाचे काम करत असून सध्या अवकाळी पावसाचा व कोरोना विषाणूमुळे निर्यातबंदीचा फटका बसत असल्याने त्यांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. साधारणत: जानेवारी-फेब्रुवारीमध्येच शेतकरी लाखो रु पये खर्च करून बेदाण्यासाठी शेडची उभारणी करतात. त्यानंतर तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडे जाऊन हिरवे मणी तसेच काळीचे मणी विकत घेऊन त्यावर प्रक्रि या करून हा बेदाण्याचा माल तयार करतात. बेदाणे तयार करण्यासाठी मजुरांनाही रोजगार उपलब्ध होतो. यासाठी बँक सोसायटी यांच्याकडून कर्ज घेऊन बेदाणे व्यवसाय केला जातोे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या बेदाण्या मालाचे नुकसान झाले आहे. त्यातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याने संचारबंदी, निर्यातबंदी व लॉकडाउन याचा फटका बेदाणा उत्पादक शेतकºयांना बसला आहे.

बेदाण्याचा माल तयार करूनही व्यापारीच नसल्याने हा माल विकायचा कसा व झालेल्या खर्चाचे करायचे काय? त्यातच सद्य:स्थिती पाहता मजूरही मिळत नसल्याने व व्यापारीही फिरकत नसल्याने बेदाणे उत्पादक शेतकºयांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. बँक व सोसायटीचे कर्ज फेडायचे कसे आणि शेतकºयांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे द्यायचे कोठून, असा प्रश्न बेदाणे उत्पादकांना पडला आहे. शासनाने यावर त्वरित उपाययोजना करून लवकरात लवकर निर्यातबंदी उठून शेतकºयांचे होणारे आर्थिक हाल थांबवावे, अशी मागणी बेदाणे उत्पादकांनी केली आहे.
अवकाळी पाऊस पडत असल्याने द्राक्षशेतीबरोबर खरबूज या पिकाचेही नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दिवसोंदिवस मेटाकुटीस आला आहे. शेतकºयांनी जगायचे कसे? दरवर्षी कोणती ना कोणती नैसर्गिक आपत्ती येत असल्याने कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न पडला आहे.
- वैभव गायकवाड, बेदाणा उत्पादक

कोरोना या विषाणूमुळे सध्या सर्वत्र निर्यातबंदी करण्यात आल्यामुळे याचा सर्वात जास्त फटका हा शेतकºयांना बसला आहे. शेतकºयांचे जगणे मुश्कील झाले आहे. अनेक वर्षांपासून आम्ही बेदाणे तयार करण्याचे काम करत असल्याने दोन पैसे मिळतील या आशेपोटी बँकेकडून कर्ज घेऊन बेदाण्याचे शेड उभारले. मात्र व्यवसाय संकटात आला आहे. शासनाने याची तत्काळ दखल घेऊन निर्यातबंदी उठवावी.
- संतोष गायकवाड, बेदाणा उत्पादक

Web Title: Extremely productive farmers are scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.