गोदावरी पात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 01:47 AM2021-11-27T01:47:12+5:302021-11-27T01:48:11+5:30

शहरात एकामागून एक खुनांची मालिका सुरू असताना केटीएचएम महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोदावरी नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

Excitement over finding bodies in Godavari container | गोदावरी पात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ

गोदावरी पात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ

Next

नाशिक : शहरात एकामागून एक खुनांची मालिका सुरू असताना केटीएचएम महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोदावरी नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. नदीपात्रात मृतदेह आढळलेल्या व्यक्तीने आत्महत्या केली की त्याचा खून करून मृतदेह नदीत फेकण्यात आला याविषयी शाशंकता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मयत व्यक्तीच्या अंगावर काळ्या रंगाची पॅँट होती, परंतु शर्ट नसल्याने संबंधित इसम हा नदीपात्रात मासेमारी करणारा व्यक्ती असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून नशेच्या अवस्थेत नदीत गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Excitement over finding bodies in Godavari container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.