किल्ल्यांवरील खोदाईमुळे ऐतिहासिक वास्तूंची होतेय हानी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 11:03 PM2021-09-28T23:03:09+5:302021-09-28T23:04:27+5:30

त्र्यंबकेश्वर : शिवकालीन गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करावे अशा मागणीचे साकडे गडकोट कार्य संस्थेतर्फे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना एका पत्रान्वये घातले आहे. सर्वाधिक डोंगरी गडकिल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या रामशेज, हरिहर, पिसोळगड, इंद्राई, हातगड, वाघेरा किल्ला, खैराई किल्ला, हरसूल या ठिकाणी उपद्रवी लोकांकडून होणाऱ्या खोदाईमुळे वीरांच्या समाध्या, सरदारांचे वाडे, सैनिकांचे जोते, राणीवसा या ऐतिहासिक वास्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे.

Excavations on forts cause damage to historical monuments! | किल्ल्यांवरील खोदाईमुळे ऐतिहासिक वास्तूंची होतेय हानी!

किल्ल्यांवरील खोदाईमुळे ऐतिहासिक वास्तूंची होतेय हानी!

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : नुकसान थांबविण्याची शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

त्र्यंबकेश्वर : शिवकालीन गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करावे अशा मागणीचे साकडे गडकोट कार्य संस्थेतर्फे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना एका पत्रान्वये घातले आहे. सर्वाधिक डोंगरी गडकिल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या रामशेज, हरिहर, पिसोळगड, इंद्राई, हातगड, वाघेरा किल्ला, खैराई किल्ला, हरसूल या ठिकाणी उपद्रवी लोकांकडून होणाऱ्या खोदाईमुळे वीरांच्या समाध्या, सरदारांचे वाडे, सैनिकांचे जोते, राणीवसा या ऐतिहासिक वास्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे.

याबाबत वन विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कुठेतरी शेवटच्या घटका मोजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे प्रकार थांबवावेत. तसेच किल्ल्यांच्या परिसरात होणारे खोदकाम, बांधकाम व खाणकाम कायमस्वरूपी बंद करावे, अन्यथा दरड पडण्याच्या घटना व किल्ल्यांना बसणारे हादरे यामुळे ऐतिहासिक वारसा धोक्यात येईल. याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी वन, केंद्रीय, राज्य पुरातत्व, जिल्हा प्रशासन दुर्गसंवर्धन संस्थांची एकत्रित बैठक लावावी अशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते राम खुर्दळ यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.


ऐतिहासिक ठेवा होतोय अस्पष्ट
नाशिकच्या गडकिल्ल्यांवर धनाच्या लालसेपोटी काही स्वार्थी, लोभी, उपद्रवी मंडळीकडून किल्ल्यांची अतोनात हेळसांड सुरू आहे. पिसोळगड (बागलाण) येथील ३ समाध्यांची पूर्ण नासधूस केली आहे. रामशेजवर नावालाच उरलेल्या सरदाराच्या वाड्याला सैनिकांच्या जोत्यांच्या मधोमध खोदून ठेवले आहे. तर इंद्राई किल्ल्याच्या पायथ्याच्या मंदिरातील मूर्तीच गायब आहे. हातगडचा राणीवसा मधोमध खोल खोदून ठेवला आहे. हरिहर किल्ल्यावरील दगडी मूर्ती गायब आहेत. तर वाघेरा (त्रंबक) किल्ल्याच्या आजूबाजूला वनसंपदेला लाकूड माफियांचा हैदोस सुरू आहे.

ऐतिहासिक वास्तूंची हेळसांड थांबवा
दरवर्षी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वणवे लावून जैवविविधता, वन्य प्राणी, पक्षी नष्ट होत आहे याकडे ही वन विभागाने दुर्लक्षच केले आहे. नाशिकच्या गोदावरी पात्रात असलेल्या गोपिकाबाई पेशवे समाधी तसेच बलकवडे बंधू समाधी स्थळाची जोपासना व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी या विषयावर संबंधित विभागांना सूचना करून गडकोटांच्या भूमीतील ऐतिहासिक वास्तूंची हेळसांड थांबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आम्ही गेली १५ वर्षे नाशिकच्या भूमीतील गडकिल्ले, बारवा, पुरातन समाध्या, वीरगळ, यांच्या जतन संवर्धनासाठी जिवापाड राबतोय, समाज, सरकार, प्रशासन मात्र सातत्याने दुर्लक्ष करतोय आम्ही मोहिमे दरम्यान अभ्यासात्मक श्रमदान करतोय, मात्र जिल्ह्यातील असुरक्षित दुर्ग यांचे रक्षण करणे वन, पुरातत्व व जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. किल्ल्यांच्या परिसरात खाणकाम, खोदकाम, लाकूडतोड, वणवे यामुळे इथला निसर्ग इतिहास याला अतोनात बाधा होते. धानाच्या स्वार्थासाठी उपद्रवी किल्ल्यावरील वास्तूंची मोडतोड करतात हे दुर्दैव नाही तर काय? शिवरायांचे दुर्ग सांभाळणे, जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. मग दुर्लक्ष का होतेय, हाच सवाल अम्ही करतोय.
- राम खुर्दळ, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक.

Web Title: Excavations on forts cause damage to historical monuments!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.