एक बिबट्या जेरबंद; दुसऱ्याचे खुले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:43 AM2019-08-20T00:43:38+5:302019-08-20T00:44:22+5:30

धोंडीरोडवरील पॉवरहाउस येथील लष्करी भागात लावलेल्या पिंजºयात अखेर शनिवारी बिबट्या अटकला असला तरी, विजयनगर येथील कदम मळ्यात मात्र रविवारी सकाळी कदम परिवाराला बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

An enormous prisoner; Open sight of another | एक बिबट्या जेरबंद; दुसऱ्याचे खुले दर्शन

एक बिबट्या जेरबंद; दुसऱ्याचे खुले दर्शन

Next

देवळाली कॅम्प : धोंडीरोडवरील पॉवरहाउस येथील लष्करी भागात लावलेल्या पिंजºयात अखेर शनिवारी बिबट्या अटकला असला तरी, विजयनगर येथील कदम मळ्यात मात्र रविवारी सकाळी कदम परिवाराला बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
शनिवारी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान धोंडीरोड परिसरात लावलेल्या पिंजºयात बिबट्या अडकल्याने त्याने डरकाळ्या फोडायला सुरुवात केली. बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान, बिबट्या पिंजºयात अडकल्याची माहिती वनविभागाला कळविण्यात आली त्यानंतर काही वेळात वनविभागाचे अधिकारी मधुकर गोसावी, गोविंद पंढरे यांनी घटनास्थळी येऊन बिबट्यासह पिंजरा ताब्यात घेतला. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धोंडीरोड परिसरात दहशत तयार करून अनेक वाहनधारकांना दर्शन दिले होते. यामुळे रात्री उशिरा वाहनधारक घरी परताना जीवमुठीत घेऊन परतत होते. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी भयमुक्त झाल्याचे सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून देवळाली कॅम्प, भगूर, एकलहरे, दसक-पंचक, नाशिकरोड आणि जेलरोड भागातील मळे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीती
रविवारी सकाळी ७.३० वाजेपासून विजयनगर येथील सैनिक सोसायटीजवळ असलेल्या अंबादास कदम यांना घराजवळच्या शेतातून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. घरालगतच्या मळ्यात बसलेल्या बिबट्यामुळे कदम मळा, शेळके मळा, करंजकर मळा परिसरात दिवसभर शेतकºयांनी शेतात जीवमुठीत धरून काम केले. तर काहींनी शेतीची कामे बंद ठेवली. विजयनगर हा भाग नागरी परिसरापासून हाकेच्या अंतरावर असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: An enormous prisoner; Open sight of another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.