कांदा लागवडीत शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:46 PM2020-01-10T22:46:06+5:302020-01-11T01:02:40+5:30

दत्ता महाले । येवला : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे दर मागील एक ते दोन ...

Engage farmers in onion cultivation | कांदा लागवडीत शेतकरी व्यस्त

कांदा लागवडीत शेतकरी व्यस्त

googlenewsNext
ठळक मुद्देलगबग : बाजारभाव मिळतो की नाही याची शाश्वती नसल्याने चिंता

दत्ता महाले ।
येवला : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे दर मागील एक ते दोन महिन्यांपासून टिकून असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी महिना संपेपर्यंत कांदा लागवड सुरू राहणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कांदा रोपे खराब झाली. अवकाळी पावसाने तब्बल तीनदा रोपे वाया गेल्याने सध्या रोपाला सोन्याचा भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कांदा लागवड न करता महागड्या दराने रोपे विकून आर्थिक प्राप्ती करून घेत आहे. तर तालुक्याच्या काही भागात यंदा समाधानकारक पावसामुळे कांदा लागवडीवर भर आहे. एकीकडे घरची रोपे सडून गेली तर दुसरीकडे बाजार समित्यात कांद्याचे भाव गगनाला भिडत असल्याने महागड्या किमतीने का होईना मिळेल तेथून रोपे घेऊन कांदा लागवडीसाठी शेतकरी वर्गाची लगीनघाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महिनाभरापासून येवला तालुक्यातील सर्वच भागात वातावरणात सातत्याने बदल होत आहे.पहाटे पडणाºया दाट धुक्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. वातावरण बदलामुळे कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरु वात झाली आहे. दाट धुक्याने नवीन कांदा लागवड धोक्यात आली असून, लागवड केलेल्या कांद्याचे शेंडे पिवळसर पडत असल्याने सातत्याने औषध फवारणी कांद्यावर करावी लागत असल्याने कीटकनाशकांचा खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कांद उत्पादन झाल्यानंतर बाजारात शाश्वत दर मिळेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

मजुरांची वानवा; मजुरीही वाढली
येवला तालुक्यातील राजापूर, पाटोदा, मानोरी बुद्रुक, चिचोंडी,
नेऊरगाव, देशमाने, जळगाव नेऊर, कोटमगाव, अंदरसूल, नगरसूल
आदी भागात अद्यापही कांदा लागवडीसाठी मजुरांची वानवा भासत
आहे. मजूर वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी विकत घेतलेली रोपे खराब होत चालली असून, मजुरीचा दरदेखील वाढला आहे. सध्या कांदा लागवडीचा प्रतिएकर भाव हा तब्बल आठ हजार रु पयांपर्यंत पोहचला असून, ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी शेतकरी जादा पैसे देऊन मजूर आपल्या शेतात बोलवत असल्याचेही दिसून येत आहे.

औषध फवारणीचा खर्च वाढला
कांदा दर चांगल्या प्रकारे टिकून असल्याने यंदा मजुरांचीदेखील कांदा लागवडीसाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कांदा लागवडीसाठीचे क्षेत्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक शेतकºयांनी पेरणी केलेला हरभरा पीक नांगरून कांदा लागवड केली आहे.
ढगाळ वातावरणामुळे औषध फवारणी करण्याचा खर्चदेखील वाढला आहे. सध्या लागवड केलेल्या कांद्याला भाव मिळतो का नाही, याची कोणत्याही प्रकारची शाश्वती नसून कांदा लागवड जगविण्यासाठी मात्र शेतकरी जिवाचे रान करत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Engage farmers in onion cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.