विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:08 PM2020-02-01T23:08:57+5:302020-02-02T00:13:12+5:30

दरेगाव : तालुक्यातील दरेगाव, निमोण या गावांना दुगाव सबस्टेशन मधून वीजपुरवठा होतो. सतत होणाºया खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले ...

Electricity disasters hurt students along with farmers | विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थी त्रस्त

विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थी त्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्देदरेगाव, निमोण गावांतील शेतकऱ्यांमध्ये संताप; रब्बी पिकांनाही फटका

दरेगाव : तालुक्यातील दरेगाव, निमोण या गावांना दुगाव सबस्टेशन मधून वीजपुरवठा होतो. सतत होणाºया खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेअभावी रब्बी पिके धोक्यात आली आहेत. भारनियमनाव्यतिरिक्त सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वीजग्राहकांनी केली आहे.
दरेगाव, निमोण भागात सध्या उन्हाळ कांदा, हरभरा, गहू, भाजीपाला रब्बी पिके घेते आहेत. भारनियमनाव्यतिरिक्त सतत वीजपुरवठा खंडित होतो. विजेचा दाब हा सातत्याने कमी-अधिक होत असतो. दर पाच मिनिटांनी होणाºया खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाले असून, वीज वितरणच्या कारभाराबाबत शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खरिपाच्या पिकांची अवकाळी पावसाने नासाडी झाल्याने शेतकरी रडकुंडीला आले असताना विजेअभावी रब्बी पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत.
शेतकºयांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची हेळसांड होत असून, होणाºया नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरीवर्गासमोर उपस्थित होत आहे.
शेतात पाणी भरण्यासाठी अनेक शेतकरी वीजकडे डोळे लावून बसलेले दिसतात. पाणी असूनदेखील डोळ्यासमोर पिके सुकू लागल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो त्यामुळे शेतकºयांचा वेळ वाया जात आहे. त्याचबरोबर गावातील सिंगल फेज योजना बंद होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात तसेच विविध उपकरणे बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांचीही वार्षिक परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. खरोखरच हेच का अच्छे दिन असे म्हणायची वेळ आली आहे. वीजपुरवठा आदी कारणांमुळे वीजग्राहक वैतागले आहेत. पाणी आहे तर वीज नाही अन् वीज आहे तर पाणी नाही, अशी परिस्थिती तालुक्यात पहायला मिळत आहे.
वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

Web Title: Electricity disasters hurt students along with farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.