चांदोरीच्या रॅँचोने बनविली इलेक्ट्रिक कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:17 PM2020-02-14T13:17:46+5:302020-02-14T13:19:00+5:30

चांदोरी  : येथील भूमिपुत्र आणि सध्या सोनारी येथे राहत असलेल्या प्रतीक एकनाथ जाधव या शेतकरी कुटूंबातील युवकाने विद्युत ऊर्जेवर ...

 Electric car made by Chandori range | चांदोरीच्या रॅँचोने बनविली इलेक्ट्रिक कार

चांदोरीच्या रॅँचोने बनविली इलेक्ट्रिक कार

Next

चांदोरी  : येथील भूमिपुत्र आणि सध्या सोनारी येथे राहत असलेल्या प्रतीक एकनाथ जाधव या शेतकरी कुटूंबातील युवकाने विद्युत ऊर्जेवर बॅटरी चार्ज करून १०० किलोमीटर धावणारी प्रदूषणरहित कार तयार केली आहे.
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना स्वत:च्या हातात थोडे फार पैसे आल्याशिवाय प्रतीकच्या स्वप्नांना पंख फुटणार नव्हते. शिकाऊ म्हणून एक वर्ष काम केल्यानंतर सिन्नर येथील एका कंपनीमध्ये त्याने नोकरी मिळवली आणि बेरोजगारीचे संकट टळले. येणाऱ्या पगाराच्या पैशातून विद्युत कारचे काम सुरु केले. हळू हळू स्पेअर विकत घेण्यास सुरवात केली.पण महागड्या वस्तू खरेदी करणे त्याच्या खिशाला परवडणारे नव्हते . बाजारातील वापरबाह्य झालेले टायर, शीट ,बॅटरी अशा विविध आवश्यक वस्तू खरेदी केल्या. ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ अशी विद्युत कार तयार केली. दुचाकीला वापरल्या जाणाºया जुन्या स्पेअरचा तसेच जे स्पेअर मिळाले नाही ते त्याने स्वत:च बनवले. वडील एकनाथ जाधव मदतीला उभे होतेच.तब्ब्ल तीन वर्ष अथक कष्ट घेऊन विद्युत कारचे स्वप्न पूर्ण केले.
-----------
एक्सेल द पॉवर
ही विद्युक कार पर्यावरण पूर्वक विचार करून बनवली आहे. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण न करणारी ही कार आहे. त्याने कार ला ‘एक्सेल द पॉवर’ असे नाव दिले आहे. ४८ व्होल्ट व १०० अ‍ॅम्पीअरच्या दोन बॅटºया सहा तास चार्जिंग केल्यास ही कार १०० किलोमीटर अंतर आरामात कापू शकते. सहाशे किलो पर्यंतचे वजन वाहून नेण्याची तिची क्षमता असल्याचा प्रतीकचा दावा आहे.विशेष म्हणजे कार विना गियरची आहे.
आॅटोमोबाईल क्षेत्रात नव्याने विकिसत झालेल्या तंत्रज्ञाचा वापर या कार मध्ये केला आहे. भविष्यात या कार ला सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर आणि सोलर कार म्हून विकसित करण्याचा मानस आहे.
------------------------------
दहावी नंतर पुढे औद्यागिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय ) मधून फिटर या विभागातून दोन वर्षाचे प्रशिक्षण यशवीरित्या पूर्ण केले. नंतर तो एक वर्षसाठी महिंद्रा ( सीआयइ ) अंबड येथे शिकाऊ उमेदवार म्हणून गुणवत्ता नियंत्रक पदावर काम करत होता. तेथे काम करत असताना विविध विद्युत यंत्र बघितले होते. तांत्रिक संशोधनाचा कामातून त्याला प्रेरणा घेत प्रतिकने २०१६ सप्टेंबर दरम्यान विद्युत कार बनविण्याचे काम हाती घेतले.
------------------------------
भविष्यात या कारच्या सौर उर्जेवर चालविण्याच्या चाचण्या घेऊन , पेटंट मिळवून सर्वसामान्य कुटुंबापर्यंत कमी किमतीत ही कार पोहचवण्याचा मानस आहे.
------- प्रतीक जाधव, चांदोरी

Web Title:  Electric car made by Chandori range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक