निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित : श्रीकांत देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 01:25 AM2021-12-05T01:25:57+5:302021-12-05T01:27:44+5:30

लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व असून निवडणुकांमुळेच लोकशाहीचा ढाचा अबाधित आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.भुजबळ नॉलेज सिटी येथे सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व अखिल भारतीय साहित्य महामंडळ यांच्या आयोजित लेखक, भाषा आणि लोकशाही या चर्चासत्रात ते बोलत होते.

Elections disrupt democracy: Shrikant Deshpande | निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित : श्रीकांत देशपांडे

निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित : श्रीकांत देशपांडे

Next
ठळक मुद्देमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे संमेलनात प्रतिपादन

नाशिक : लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व असून निवडणुकांमुळेच लोकशाहीचा ढाचा अबाधित आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.भुजबळ नॉलेज सिटी येथे सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व अखिल भारतीय साहित्य महामंडळ यांच्या आयोजित लेखक, भाषा आणि लोकशाही या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, निवडणूक उपजिल्हाधिकारी स्वाती थवील, तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले, लोकशाही ही व्यापक संकल्पना असून, कला व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती लोकशाहीच्या संकल्पना मूर्त स्वरूपात राबविण्याचा प्रयत्न करीत असतात. भारतात लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व अबाधित आहे, सरकारी कामकाजातील भाषा लोकशाहीला पूरक असते. लोकशाहीचे महत्त्व पटवून देणारे चर्चासत्रांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे, असे मतही यावेळी देशपांडे यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल चर्चासत्रात म्हणाले, लोकशाही हा फक्त राजकारणाचा विषय नाही. तर लोकजीवनाचा भाग आहे. लोकशाहीचा गाभा व्यक्ती स्वातंत्र्य आहे. लोकशाहीत बहुविध माध्यमांचा चर्चेसाठी वापर होणे गरजेचे आहे.पत्रकार दीप्ती राऊत यांनी निष्पक्ष राहून लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी खरा पत्रकार काम करत असल्याचे सांगितले. लोकशाही प्रक्रियेत स्त्रियांना सर्व क्षेत्रात समानसंधी मिळाली पाहिजे. पंचायतराज व्यवस्थेत स्त्रियांना संधी मिळत आहे; मात्र साहित्य व सामाजिक जीवनात अद्याप समानता आली नसून कुटुंब संस्थेतही खऱ्या अर्थाने लोकशाही रुजण्याची गरज असल्याचे सांगितले. पत्रकार, अनुवादक इब्राहिम अफगाण यांनी लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्तीचा वापर लेखक करत असल्याचे सांगितले. लोकशाही असल्यामुळे आज अभिव्यक्त होण्यापासून आपणास कोणी रोखू शकत नाही. जो कोणी व्यक्त होण्यासाठी बहुविध माध्यमांचा वापर करतो तो लेखक असतो.

इन्फो

प्रत्येकाने भूमिका घेणे आवश्यक

सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ म्हणाले, प्रत्येक भाषा त्यांचे संचित घेऊन येत असते. या देशात शेकडो भाषा आहेत. बहुविध माध्यमांतून व्यक्त होता येते, यात लोकशाहीचे यश सामावलेले आहे. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन प्रत्येक व्यक्तीने भूमिका घेणे आवश्यक आहे. डॉ. दीपक पवार यांनी चर्चासत्राचे संवादक म्हणून काम पाहिले. या चर्चासत्रामध्ये शेवटी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला, त्यावेळी उपस्थितांनी आपले प्रश्न विचारले व त्यांच्या प्रश्नाचे समाधान चर्चासत्रातील सहभागी वक्त्यांनी केले.

Web Title: Elections disrupt democracy: Shrikant Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.