प्लॅस्टिक पार्क उभारणारणीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:44 PM2020-02-21T23:44:24+5:302020-02-22T01:19:13+5:30

मालेगाव शहर परिसरातील प्लॅस्टिक उद्योगासाठी प्लॅस्टिक पार्क उभारून येथील या प्रक्रिया उद्योगाला उभारी देऊ, अशी माहितीे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

Efforts to set up a plastic park | प्लॅस्टिक पार्क उभारणारणीसाठी प्रयत्न

मालेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार डॉ. सुभाष भामरे. समवेत जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, भाजयुमोचे लकी गिल, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, मुकेश झुनझुनवाला, उमाकांत कदम आदी.

Next
ठळक मुद्देसुभाष भामरे : मालेगाव येथील मजुंराच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर

मालेगाव : शहर परिसरातील प्लॅस्टिक उद्योगासाठी प्लॅस्टिक पार्क उभारून येथील या प्रक्रिया उद्योगाला उभारी देऊ, अशी माहितीे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लॅस्टिक कारखान्यांवर कारवाई केली जात आहे. कारखाने सील केले जात असल्यामुळे ७० ते ८० हजार मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुका प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या पदाधिकारी व उद्योजकांनी खासदार भामरे यांची येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन अडीअडचणी मांडल्या. राष्टÑीय हरित लवादाच्या निर्देशानंतर प्लॅस्टिक कारखान्यांवर कारवाई केली जात आहे. शहरात १८८ प्लॅस्टिक प्रक्रिया कारखाने आहेत. कारखानदारांची बाजू समजून घेतल्यानंतर खासदार भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी डॉ. भामरे म्हणाले की, शहरातील १८८ कारखान्यांपैकी १२० कारखाने सील करण्यात आले आहेत. याबाबत सुवर्णमध्य काढला जाईल. येथील प्लॅस्टिक पार्क मंजुरीसाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविला जाईल. या प्रकल्पामुळे रोजगाराचा प्रश्न निकाली निघणार आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. झोडगे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. नार-पारचे सर्वेक्षणदेखील पूर्ण झाले आहे. भाजप शासनाने १४ कोटी रुपयांची यासाठी तरतूद केली होती. नदीजोड प्रकल्पाचा रोडमॅप तयार आहे.
मांजरपाडा - २ प्रकल्पावर नऊ धरणे उभारण्यात येणार आहे. पाणी चणकापूर धरणात आणले जाईल. यासाठी गुजरातबरोबर समझोता करार करण्याची गरज नाही. या प्रकल्पामुळे कसमादेचा सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़
मालेगाव - धुळे दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर एमएच ४१ क्रमांकाच्या वाहनांना टोल शुल्क माफ करावे, अशी मागणी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष लकी गिल यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे केली आहे. तसेच पर्यटन विकासांतर्गत भुईकोट किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी दीड कोटीचा निधी मंजूर झाला होता. याला सध्याच्या शासनाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवावी, तसेच किल्ल्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, हरिप्रसाद गुप्ता यांच्यासह पदाधिकाºयांनी केली आहे.

Web Title: Efforts to set up a plastic park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.