आयात घटल्याने खाद्यतेलाचा डबा दोनशे रुपयांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 01:35 PM2020-03-25T13:35:33+5:302020-03-25T13:46:24+5:30

 दैनंदिन गरजेच्या वस्तुंमध्ये समावेश असलेले  तसेच खाद्य पदार्थाच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्य तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होत असतो. कोरोनाचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर होताना दिसून येऊ लागली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परेदेशातून होणारी आयात थांबल्याने खाद्य तेलाचे भाव जवळपास दोनशे रुपयांनी वाढले आहेत.

Edible oil became expensive by Rs | आयात घटल्याने खाद्यतेलाचा डबा दोनशे रुपयांनी महागला

आयात घटल्याने खाद्यतेलाचा डबा दोनशे रुपयांनी महागला

Next
ठळक मुद्देशेंगदाना तेल दोनशे रुपयांनी महागलेखाद्य तेलाची आयात घटल्याचा परिणाम

नाशिक : कोरोनाचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर होताना दिसून येऊ लागली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परेदेशातून होणारी आयात थांबल्याने खाद्य तेलाचे भाव जवळपास दोनशे रुपयांनी वाढले आहेत. कोरोनामुळे अचानक किराणामालाला वाढलेली मागणी व आयात थांबल्याने आयात होणाया पाम तेलाचे व सूर्यफूल तेलासह सोयाबीन, शेंगदाना तेलाचेही भाव वाढले आहोत.
    दैनंदिन गरजेच्या वस्तुंमध्ये समावेश असलेले  तसेच खाद्य पदार्थाच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्य तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होत असतो. या पूर्वी आयात शुल्क वाढल्याने पाम तेल व सोयाबीन तेलाचे भाव वाढले होते. त्यानंतर अतिपावसामुळे सोयाबीन तेलाचे भाव वाढले होते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे बाजारपेठेत आयात होणाऱ्या वस्तुंचे भाव कडाडले होते. आता गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने कोरनाचा फैलाव होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील आयात-निर्यातीलाही फटका बसला आहे. याचा सर्वाधिक फटका खाद्यतेलाला बसला असून नाशिकमधील बाजारपेठेत गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत शेंगदाना तेलाचा १५ किलोचा डब्बा तब्बल दोनशे रुपयांनी महागला असून सोयाबीनेचा १५ कि लोचा डबा १६५ रुपयांनी , पामतेल प्रति १५ किलो ६० रुपयांनी , सूर्यफूल तेल प्रती १५ लिटर ४० ते ५० रुपयांनी महागले आहे. आयात तेलाची कमतरता भासू लागल्याने तसेच ग्राहकांकडून स्थानिक खाद्यतेलाला मागणी वाढल्याने बाजारपेठेत खाद्य तेलाचे भाव वाढल्याचे दिसून आले आहे. 

Web Title: Edible oil became expensive by Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.