Dwarka to Bitko Chowk will cut down the trees | द्वारका ते बिटको चौक दरम्यान झाडे तोडणार
द्वारका ते बिटको चौक दरम्यान झाडे तोडणार

ठळक मुद्देवृक्षप्राधिकरणाचा निर्णय : शेकडोंची होणार लागवड

नाशिक : द्वारका ते बिटको चौक या राष्टÑीय महामार्गाच्या रुंदीकरणास अडथळा ठरण्याबरोबरच शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या मध्यभागी अपघातास कारणीभूत ठरलेले सुमारे शंभराहून अधिक झाडे तोडण्यास महापलिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली असून, त्यामुळे विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र तोडलेल्या वृक्षाच्या एकाच्या मोबदल्यात प्रत्येकी पाच अशाप्रकारे वृक्षलागवड करण्याची सक्ती संबंधितांवर करण्यात आली असून, काही वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचेही ठरविण्यात आले आहे.
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक अध्यक्ष तथा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात २२ विषय चर्चेला ठेवण्यात आले. प्रामुख्याने वृक्षप्राधिकरणाची कार्यपद्धती व वृक्षप्राधिकरणाच्या बजेट या दोन महत्त्वांच्या विषयांबरोबरच विकासकामांना अडथळा आणणारे वृक्षांच्या तोडीस मंजुरी देण्याचे विषय ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारने द्वारका ते बिटको चौकापर्यंतच्या रस्ता राष्टÑीय महामार्ग म्हणून यापूर्वीच घोषित केला असून, त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्तावदेखील राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केला आहे. मात्र या रस्त्याच्या दुतर्फा असलेले वृक्ष तोडण्याचा वाद निर्माण झाला होता. या संदर्भात उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच झाडे तोडण्यास अनुमती दिली होती. या विषयावर बैठकीत चर्चा होऊन दत्तमंदिर सिग्नल ते द्वारका पावेतो दरम्यान अपघातास व ट्रॉफिककरिता अडथळा निर्माण करणारे वड, मोह, कडुलिंब, शिरस, करंजी, आंबटचिंच, विलायती चिंंच असे पंधरा झाडे तोडण्यास मंजुरी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून झाडे तोडण्यास मनाही होती.
येथे होणार वृक्षतोड
अंबड औद्योगिक वसाहतीमधील वीज केंद्र विकसित करण्याच्या कामात अडथळा निर्माण करणारा काशिद, गिरीपुष्पाची २४ झाडे.४ नाशिकरोड विभागातील देवळाली सर्व्हे नं. ११७ (पै) आरक्षण क्र. २०७ येथील नाट्यगृह इमारतीस अडथळा निर्माण करणारे २६ काटेरी बाभूळ व एक सुबाभूळ तोडून २९ चंदनाचे झाडे पुनर्रोपण करणार.
४ पोलीस आयुक्तालयामार्फत प्राप्त अहवालानुसार महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणची अपघातास कारणीभूत ठरणारी रस्त्याच्या मधोमध असणारी एकूण १४ झाडांचे पुनर्रोपण व ११ झाडे तोडणार.

Web Title: Dwarka to Bitko Chowk will cut down the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.