सायबर पोलिस : दोघांना पाऊण लाखांना ऑनलाइन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 04:38 PM2020-07-05T16:38:11+5:302020-07-05T16:38:35+5:30

नागरिकांनी ऑनलाइन बॅँकींग अ‍ॅप्लिकेशनचा वापर अत्यंत सतर्कतेने करणे गरजेचे आहे, कुठल्याहीप्रकारच्या अनोळखी व्यक्ती व संस्थांकडून आलेल्या लिंक अथवा फोनद्वारे बॅँक खात्यासह अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीय माहिती उघड करू नये,

The duo spent millions of pounds online | सायबर पोलिस : दोघांना पाऊण लाखांना ऑनलाइन गंडा

सायबर पोलिस : दोघांना पाऊण लाखांना ऑनलाइन गंडा

Next

नाशिक : सैन्यदलातून अधिकारी बोलत असून दुसरीकडे बदली झाल्याचे कारण सांगून साहित्यविक्रीचा बनाव करत अज्ञात व्यक्तीने दोघांना सुमारे पाऊण लाख रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष दगडू व्यवहारे (रा. मखमलाबाद) व आदिती फुलपगार यांनी सायबर पोलिसांकडे तक्र ार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे, सैन्यदलातून बोलत असून साहित्य खरेदी करावयाचे आहे, मी तुम्हाला ‘क्युआर कोड’ ऑनलाइन पेमेंटसाठी पाठवित आहे. असे सांगून त्या अनोळखी व्यक्तीने व्यवहारे यांच्या बॅँक खात्यातून परस्पर ६७ हजार ५०० रुपये तर फुलपगारे यांच्या बॅँक खात्यातून २३ हजार ९०० रूपये काढून घेत एकूण ९१ हजार ४०० रूपयांना ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत.
नागरिकांनी ऑनलाइन बॅँकींग अ‍ॅप्लिकेशनचा वापर अत्यंत सतर्कतेने करणे गरजेचे आहे, कुठल्याहीप्रकारच्या अनोळखी व्यक्ती व संस्थांकडून आलेल्या लिंक अथवा फोनद्वारे बॅँक खात्यासह अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीय माहिती उघड करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: The duo spent millions of pounds online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.