नाशकात शुकशुकाट ; व्यापाऱ्यांचा स्वयंस्पूर्तीने लॉक डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 01:34 PM2020-03-22T13:34:43+5:302020-03-22T13:38:04+5:30

शहरातील कापड विक्रेते, सराफी व्यावसायिकांसह किराणा व्यावसायिकांनीही स्वयंस्फूर्तींने लॉकडाऊन करीत शंभर टक्के दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूचे कडेकोट पालन केले. जनता कर्फ्यूच्या माध्यमातून नाशिककारंनी कोरोनाविरोधी लढा जिंकण्यासाठी निर्धार केला आहे. त्यामुळे  शहरातील घाऊक कापड विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेते, रेडीमेड व होजिअरी कापड विक्रेत्यांनीही रविवारी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली

Drying up in Nashik; Automatically lock down merchants | नाशकात शुकशुकाट ; व्यापाऱ्यांचा स्वयंस्पूर्तीने लॉक डाऊन

नाशकात शुकशुकाट ; व्यापाऱ्यांचा स्वयंस्पूर्तीने लॉक डाऊन

googlenewsNext
ठळक मुद्देसराफ बाजार सलग तीन दिसऱ्या दिवशीही बंदकापड बाजाराच दोन दिवसांपासून शटर डाऊनसलून व ब्युटी पार्लर्सही दोन दिवसापासून बंद

नाशिक : कोरोना वायरसच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांनी केलेल्या जनता कर्फ्यू पाळण्याच्या आवाहनाला नशिककरांनी उत्स्फूर्त रविवारी (दि.२२) प्रतिसाद दिला. शहरातील कापड विक्रेते, सराफी व्यावसायिकांसह किराणा व्यावसायिकांनीही स्वयंस्फूर्तींने लॉकडाऊन करीत शंभर टक्के दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूचे कडेकोट पालन केले. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सराफव्यावसायिकांनी गेल्या तीन दिवसांपासून त्यांची शहरातील सर्व दुकाने बंद ठेवली आहे. त्यामुळे बाजारातील प्रतिदिन होणारी ५० कोटी या प्रमाणे जवळपास दिडशे कोटींची उलाढाल ढप्प झाली आहे, परंतु, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी व्यावसायिकांनी राष्ट्र कर्तव्य म्हणून त्यांची दुकाने  स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आहे.  ग्राहकांचे आरोग्य आमच्या साठी सर्वाधिक महत्वाचे असून त्यासाठीच सर्व सराफ व्यावसायिकांनी उत्स्फर्तपणे जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतल्याची प्रतिक्रिया सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेनत राजापूरपक यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली आहे.


जनता कर्फ्यूच्या माध्यमातून नाशिककारंनी कोरोनाविरोधी लढा जिंकण्यासाठी निर्धार केला आहे. त्यामुळे  शहरातील घाऊक कापड विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेते, रेडीमेड व होजिअरी कापड विक्रेत्यांनीही रविवारी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. त्याचप्रमाणे मेनरोड, शालीमार, कॉलेजरोड, गंगापूररोड, पंचवटी, दिंडोरीरोड, मखमलाबाद आडगाव  द्वारका, मुंबई नाका,  सिडको, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, परिसरातील विविध  दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद ठेवत जनता कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवला.

Web Title: Drying up in Nashik; Automatically lock down merchants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.